जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : सीमावादात सर्वसामान्यांची पायपीट, रेणुकादेवी भक्तांचे मोठे हाल, Video

Sangli : सीमावादात सर्वसामान्यांची पायपीट, रेणुकादेवी भक्तांचे मोठे हाल, Video

Sangli : सीमावादात सर्वसामान्यांची पायपीट, रेणुकादेवी भक्तांचे मोठे हाल, Video

महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत कर्नाटकात आहे तर कर्नाटकातील अनेकांचे महाराष्ट्रात. यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला असल्याने सीमावादात भक्तांचे हाल होत आहेत.

  • -MIN READ Local18 Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    सांगली, 09 डिसेंबर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कर्नाटक सरकारने व महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या कारणावरून महाराष्ट्र व कर्नाटक बस वाहतूक बंद केली आहे. यामुळे सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. मिरज-कागवाड या राज्य महामार्गावर म्हैसाळ येथील महाराष्ट्र- कर्नाटक सीमारेषेवर म्हैसाळजवळ कर्नाटक पोलीस व महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत कर्नाटकात आहे तर कर्नाटकातील अनेकांचे महाराष्ट्रात. सध्या अनेक यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला असल्याने सीमावादात भक्तांचे हाल होत आहेत.       कर्नाटक सरकारची बस सेवा ही कर्नाटक सीमेपर्यंत, तर महाराष्ट्र सरकारची बस सेवा ही महाराष्ट्र सीमेपर्यंत सुरू आहे. त्यामुळेच प्रवाशांना आपापल्या सीमेपर्यंत सामान डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागत आहे. सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा असल्याने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक-भक्त सौंदत्तीला जात असतात. मात्र, सीमेवरील एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवास करणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video नागरिकांची पायपीट  महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र व कर्नाटक मधील नागरिक ये जा करत असतात.  कर्नाटक या ठिकाणी महाराष्ट्र भागातील काही नागरिकांची शेती देखील आहे. तर कर्नाटक मधील नागरिकांची महाराष्ट्र मध्ये व्यवसाय व उद्योग आहे. त्यामुळे सीमावादाचा फटका या सीमारेषेवर असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर आली वेळ, पाहा Video खासगी वाहतुकीतून लूट खासगी वाहतूक सुरू आहेत. बसेस मात्र बंद आहे. खाजगी वाहनातून प्रवाशांची लूट होत आहे. कर्नाटक सीमेवर खासगी वाहतूक सुरू होती. दुचाकी, चारचाकी, वडाप यांची वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांनी सीमारेषेवर कोणत्याही प्रकारचा तणाव होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवला आहे. मात्र सीमावाद मिटवून बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचे हाल टाळता येईल,यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजे आहे..

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , sangli
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात