जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ

शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ

 शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे

शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे

शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च : शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले.

जाहिरात

या निर्णयामुळे सरळसेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट-अ, ब, क व ड (वर्ग १-४) या पदांसाठीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने शासनाने 75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया राबवित असतांना लोकप्रतिनिधींकडूनही अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत.

राज्यात पहिला, मात्र DSP च्या स्वप्नासाठी पुन्हा दिली परीक्षा; अखेर सांगलीच्या प्रमोदने मिळवलंच!

या निवेदनांचा विचार करून आणि कोरोना विषाणू संकट अशा कारणांमुळे ज्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षेत बसण्याची संधी प्राप्त करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासन सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता देण्यात येणार आहेत.  

जाहिरात
ऊसतोड मजुरांच्या मुलांचे MPSC परीक्षेत घवघवीत यश, कष्टकरी बापाचे फेडले पांग

कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांनी शिथिलता म्हणजेच जर खुल्या प्रवर्गासाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असेल तर ती 40 वर्षे ग्राह्य धरली जाईल व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे असेल तर ती 45 वर्षे ग्राह्य धरली जाईल. यामुळे ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात