Rajya Sabha Election: शिवसेनेच्या ऑफरवर संभाजीराजेंनी केलं मोठं विधान, "मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आणि..."
Rajya Sabha Election: शिवसेनेच्या ऑफरवर संभाजीराजेंनी केलं मोठं विधान, "मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आणि..."
Sambhaji Raje on Rajya Sabha Election: संभाजीराजे यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात संभाजीराजे यांनी भाष्य केलं आहे.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधीकोल्हापूर, 24 मे : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची भूमिका संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी घेतली. सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी सुद्धा संभाजीराजेंनी केली. त्यानंतर सहावी जागा लढण्याचं शिवसेनेने सुद्धा जाहीर केलं. तसेच संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढावी असा प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतर आज प्रथमच संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, "माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हा सुद्धा विश्वास आहे की, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. धन्यवाद."
संभाजीराजे यांनी हे विधान करत पुन्हा एकदा राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावला आहे. तर सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
वाचा : राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण
संभाजीराजे हे कोल्हापुरातून आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. संभाजीराजे मुंबईत आल्यावर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत राज्यसभेच्या सहाव्या जागेचा हा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, आम्ही नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला मी इतकंच सांगू शकतो. राज्यसभेच्या दोन जागेवर शिवसेना निवडणूक लढवणार.
कोल्हापुरातून देणार दुसरा उमेदवार?
संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीराजेंना कोल्हापुरातूनच शह देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांना ही संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसंच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे संजय पवार यांना शिवसेना संधी देणार आहे का, हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.