जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Radhakrishna vikhe patil : काँग्रेसमध्ये हयात घालवलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे?

Radhakrishna vikhe patil : काँग्रेसमध्ये हयात घालवलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे?

Radhakrishna vikhe patil : काँग्रेसमध्ये हयात घालवलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे?

आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिले आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिले आहे. (Radhakrushna vikhe patil)

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 21 ऑगस्ट : आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिले आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिले आहे. (Radhakrishna vikhe patil) राज्य अधोगतीला जात होते,  म्हणून आम्ही जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे यामुळे आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. असे राज्याचे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर भाष्य केले आहे. कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

जाहिरात

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले कि, काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? राज्य अधोगतीला जात होते, म्हणून आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे विखे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिले आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिले आहे. असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला. दरम्यान ते आज एक दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दरम्यान काल दिवसभर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते.

हे ही वाचा :  MLA Bachchu Kadu : बच्चू कडूंची नाराजी उघड; कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि नवनीत राणांपुढे सरकारला विचारला जाब

मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले कि, राज्यात वाळू माफियांचा उन्माद सुरू आहे. वाळू माफियांची महाराष्ट्राला कीड लागली आहे, यामुळे राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी त्यांनी दिली.

जाहिरात

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वीच बोलताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी 2024 मध्ये लढण्यात इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी आपण पराभूत होणार नाही. 2009 मध्ये नगरची जागा राष्ट्रवादीने बाळासाहेब विखेंना दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी शिर्डीत फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मला पराभव पत्करावा लागला. नंतर राज्यसभेचे सदस्य व्हावे लागले.

जाहिरात

हे ही वाचा :  शपथ घेणारे गुलाबराव पाटील दुसऱ्याच दिवशी पळाले’, विनायक राऊतांचा जोरदार पलटवार

परंतु आता मी 2024 च्या निवडणुकीत शिर्डीमधूनच उभा राहणार असून येथून चांगल्या मतांनी निवडून येईल, असा मला विश्वास वाटतो, असेही आठवले म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेतील त्या पद्धतीने काम करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात