जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शपथ घेणारे गुलाबराव पाटील दुसऱ्याच दिवशी पळाले', विनायक राऊतांचा जोरदार पलटवार

शपथ घेणारे गुलाबराव पाटील दुसऱ्याच दिवशी पळाले', विनायक राऊतांचा जोरदार पलटवार

त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची शिवसेनेसोबत राहणार, तुमच्यासापासून दूर जाणार नाही, अशी शपथ घेतली होती..

त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची शिवसेनेसोबत राहणार, तुमच्यासापासून दूर जाणार नाही, अशी शपथ घेतली होती..

त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची शिवसेनेसोबत राहणार, तुमच्यासापासून दूर जाणार नाही, अशी शपथ घेतली होती..

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 21 ऑगस्ट : ‘त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलावले होते. त्या वळेस सर्व आमदारांना विचारले होते काय हवे आहे. मुख्यमंत्री जर तुमच्या समर्थकाला व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करायला तयार असल्याचे सांगितले होते, पण शपथ घेतलेले गुलाबराव पाटील (gulabrao patil) दुसऱ्याच दिवशी पळून गेले’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळीच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती, असा खुलासा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दावानंतर खासदार विनायक राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे बोलतात त्यात तत्य काही नाही. ज्यावेळी आमदारांनी भेटीची वेळ मागितली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मातोश्रीवर बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी चहापान करत चर्चा केली होती. त्या वळेस सर्व आमदारांना विचारले होते काय हवे आहे. मुख्यमंत्री जर तुमच्या समर्थकाला व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची शिवसेनेसोबत राहणार, तुमच्यासापासून दूर जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. पण दुसऱ्या दिवशी पळून गेले, असा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केला. ‘मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण कराचे आहे.  बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मत मागायचा सुतोवाच केला आहे. देवेंद्र फडणीस यांनी दाखवून दिले आहे की मोदी पर्व संपले आहे मोदींची जादू संपली आहे, बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय समुद्रामध्ये तरता येणार नाही. देवेंद्र फडणीस यांनी प्रामाणिकपणे सांगितले आहे की मोदी पर्व संपले, याचं कौतुक आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. ( बच्चू कडूंची नाराजी उघड; कृषी मंत्री अब्दुल सत्तारांपुढे सरकारला विचारला जाब ) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. उद्याही असणार आहे कारण ते देशाचे पंतप्रधान आहे, त्यामुळे त्यांचा आम्ही सन्मान ठेवतो. एकीकडे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन मतं मागायची. बाळासाहेबांचं नाव घेऊन गद्दारी फसवताय. त्याच ठाण्यात काल बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो बाजूला झाकले होते आणि मोदी शहांचे फोटो लागले होते, यावरून शिंदेंचं खरं रूप दिसून आलं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली ‘सांगोला मेळाव्यात भगव्यामय वातावरण असणार आहे. शहाजीबापू सारखा नौटंकी करणारा माणूस जर राजकारणात विनोद करून पण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, साधे साधे विद्यार्थीही म्हणतात, सांगोला मतदार संघात शहाजीबापू नॉट ओक, अशी टीकाही राऊत यांनी केली. (विनायक मेटेंनंतर शिवसंग्रामचा आमदार कोण? संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुचवले नाव, केली मोठी मागणी) ‘गोविंदाचे संख्या साधारण दोनशे पासून साडेचारशेपर्यंत असते हे आरक्षण कसे देणार आहे. आरक्षण देताना निकष काय लावणार आहे, असा सवालही राऊत यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात