जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / घरच्या घरी बनवा ख्रिसमससाठी प्लम केक, पाहा सोपी पद्धत Video

घरच्या घरी बनवा ख्रिसमससाठी प्लम केक, पाहा सोपी पद्धत Video

घरच्या घरी बनवा ख्रिसमससाठी प्लम केक, पाहा सोपी पद्धत Video

सोप्या पद्धतीने अत्यंत उत्तम प्रतीचा प्लम केक घरच्या घरीच देखील बनवता येतो.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 24 डिसेंबर : सध्या केक हा प्रकार सर्वांच्याच आवडीचा बनला आहे. कोणताही कार्यक्रम असुदेत, आनंद साजरा करण्याचा क्षण असुदेत केक हा प्रत्येक ठिकाणी असतो. ख्रिसमस निमित्ताने ख्रिस्ती बांधव रेड वाईन प्लम केक हमखास बनवतातच. पण सध्याच्या धावत्या जगात हे बऱ्याच जणांना हे केक बनवण्याचे काम अवघड वाटते. त्यामुळे आजकाल बेकरीमधून असे केक विकत घेतले जातात. मात्र काही सोप्या पद्धतीने अत्यंत उत्तम प्रतीचा रेड वाईन प्लम केक घरच्या घरीच देखील बनवता येतो. याचीच सविस्तर रेसिपी सुनिता भोसले यांच्याकडून जाणून घेऊया. काय आहे रेड वाईन प्लम केक ? साधा प्लम केक आणि रेड वाईन प्लम केक यामध्ये अगदी थोडाच फरक आहे. रेड वाईन वापरून बनवण्यात आलेला प्लम केक एक वेगळीच चव देऊन जातो. या प्लम केकमध्ये रेड वाईन मध्ये भिजवून ठेवण्यात आलेले ड्रायफ्रूट्स वापरण्यात येतात. त्यासाठी हे ड्रायफ्रूट्स अर्धा तास देखील भिजवता येतात आणि वर्षभर देखील भिजवून ठेवता येतात. केक बनवताना हेच ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे केकला रेड वाईनचा फ्लेवर येतो. जर रेड वाईन वापरायची नसेल तर आपण ऑरेंज ज्यूसमध्ये देखील ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवू शकतो.

    ख्रिसमसनिमित्त घरीच बनवा स्वादिष्ट डोनट, भन्नाट रेसिपीचा पाहा Video

    काय काय आहे केक बनवण्याचे साहित्य? 1 कप मैद्यापासून हा प्लम केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य 300 ग्रॅम मैदा, 2 अंडी, लोणी, पीठीसाखर, व्हॅनिला इसेन्स, इलायची आणि जायफळ पूड, बेकिंग पावडर, रेड वाईनमध्ये किमान आठवडाभर भिजवून ठेवलेले ड्रायफ्रुट्स, कॅरमल साहित्य लागते. काय आहे रेड वाईन प्लम केक बनवण्याची कृती? 1. 2 चमचे लोणी, 3 चमचे पीठीसाखर एकत्र फेटून घ्या. केकमध्ये वापरण्यात येणारे ड्रायफ्रुट्स देखील गोड असल्यामुळे आपल्याला लागेल तितकी पीठीसाखर घ्यावी. 2. यामध्ये 2 अंडी फोडून घेऊन व्यवस्थित फेटून घ्यावे. जितक्या जास्त वेळ फेटता येईल तितका जास्त हा प्लम केक फुलून येतो. 3. या मिश्रणात 1 चमचा इसेन्स, 1 चमचा बेकिंग पावडर इलायची आणि जायफळ पूड 1 चमचा घालून मिश्रण पुन्हा फेटून घ्यावे. 4. यानंतर आवश्यक तितके कॅरमल टाकून फेटावे. साखर गरम करून हे कॅरमल घरच्या घरीच बनवता येते. 5. शेवटी या मिश्रणात रेड वाईनमध्ये भिजवून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून पुन्हा हे मिश्रण एकजीव करावे. 6. तयार झालेले मिश्रण आपल्याला हव्या त्या साच्यात घालून 30 मिनिट हा केक बेक करावा. ओव्हन किंवा कुकरमध्ये देखील हा केक बनवता येतो.

    25 प्रकारच्या केक सोबत घ्या ख्रिसमसचा डबल आनंद, पाहा video

    कोणकोणते ड्रायफ्रुट्स भिजवता येतात रेड वाईनमध्ये? रेड वाईनमध्ये भिजवताना बेदाणा, चेरी, टुटी-फ्रुटी, अंजीर, अक्रोड, ऑरेंज पिल आदी ड्रायफ्रुट्स आपण वापरू शकतो. तर काजू, बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रुट्स केक तयार झाल्यानंतर सजावटीसाठी वापरता येतात, अशी माहिती देखील सुजाता भोसले यांनी दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात