पुणे , 24 डिसेंबर : ख्रिसमस म्हटलं की सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. ख्रिसमसच्या दिवशी लोक चर्चमध्ये जातात. येशू ख्रिस्ताना प्रार्थना करतात. एकमेकांना शुभेच्छा देत केक खाऊ घालतात. या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे. याच निमित्ताने पुण्यातील 80 वर्ष जुनी असलेल्या मुर्तिज बेकरीने आपल्या खास शैलीमध्ये ख्रिसमसनिमित्त विविध केक सादर केले आहेत. यामध्ये पैठणी केक, साडी केक, आईस बकेट केक, सांताक्लॉज केक बेल केक तसेच येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाच्या देखावा असणाऱ्या तब्बल छोट्या मोठ्या 25 प्रकारच्या केकचा समावेश आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत केक? हे सर्व केक स्पेशल चॉकलेटचे आहेत. चॉकलेट साताक्लॉज, चॉकलेट ख्रिसमस ट्री, चॉकलेट स्टार, चॉकलेट स्टॉकिंग, चॉकलेट बेल्ट, चॉकलेट रेनडिअर, चॉकलेट नो मॅन्स, चॉकलेट सांताक्लॉजच फेज, चॉकलेट चेरी, रम आणि छोटे मोठे केक यंदाच्या या ख्रिसमससाठी बनविण्यात आल्या आहेत. यासोबतच ख्रिसमसचे पारंपारिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिच प्लम केक, रीच प्लम पुडींग या दोन केक ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी परफेक्ट केकच्या शोधात आहात? पुण्यात या शॉपना भेट देऊन बघा
याबाबत मूर्ती बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी सांगितले की, गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही सर्व धर्मीय सणउत्सवाच्या वेळेस त्या त्या सणांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या वस्तू आम्ही चॉकलेट मध्ये बनवत असतो. यंदा देखील आम्ही ख्रिसमसच्या या पार्श्वभूमीवर विविध चॉकलेट सांताक्लॉज, चॉकलेट ख्रिसमस ट्री, चॉकलेट स्टार, चॉकलेट स्टॉकिंग, चॉकलेट बेल्ट, चॉकलेट रेनडिअर, चॉकलेट नो मॅन्स, चॉकलेट सांताक्लॉजच फेज, चॉकलेट चेरी आणि रम, हे चॉकलेट मध्ये बनविण्यात आले आहेत तर आम्ही एक गिफ्ट पॅक बनविला आहे ते यंदाच विशेष आहे. यात सर्व साहित्य हे चॉकलेटचे असतात. कोणालाही गिफ्ट देण्यासाठी हे गिफ्ट पॅक उपयोगी ठरणार आहे. केकची किंमत 50 रुपयांपासून 2 हजार रुपये सध्या वाढत असलेल्या महागाईचा फटका यंदाच्या ख्रिसमस मध्ये बनविण्यात आलेल्या केकला देखील बसला आहे. 20 ते 30 टक्के भाव वाढ यंदा केक मध्ये करण्यात आली आहे. या केकची किंमत 50 रुपयांपासून 2 हजार रुपये आहे. ग्राहकांकडून केकला मागणी असल्याचं विक्रम मूर्ती यांनी सांगितलं.
कुठं खरेदी करू शकता? मुर्तीज पद्मसुंदर निवास, सोमवार पेठ, पुणे, महाराष्ट्र संपर्क क्रमांक - 7447769263