जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Suicide Case : कोल्हापूर हादरलं! WhatsApp स्टेटस ठेवत 19 वर्षीय मुलाची आत्महत्या

Kolhapur Suicide Case : कोल्हापूर हादरलं! WhatsApp स्टेटस ठेवत 19 वर्षीय मुलाची आत्महत्या

Kolhapur Suicide Case : कोल्हापूर हादरलं! WhatsApp स्टेटस ठेवत 19 वर्षीय मुलाची आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या दत्तवाड गावातील एका तरूणाने आत्महत्या केली आहे. (Kolhapur Suicide Case)

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 05 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या दत्तवाड गावातील एका तरूणाने आत्महत्या केली आहे. (Kolhapur Suicide Case) आपल्या दत्तवाड (ता. शिरोळ) येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ सुभाष जाधव (वय 19 ) या महाविद्यालयीन तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने दत्तवाड गावात अचानक खळबळ माजली होती. दरम्यान त्याने का आत्महत्या केली हे कारण समोर येऊ शकले नाही.

जाहिरात

सिद्धार्थने मलिकवाड रोड दत्तवाड येथील आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. सिद्धार्थ बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिस तपास करीत आहेत. कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे समजले नसल्याने गावात चर्चेला उधाण आले होते.

हे ही वाचा :  औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव फुटल्याच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल, प्रशासनाची मोठी कारवाई

ही घटना आज सकाळी उघडकीस येताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत  पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतचा तपास बीट अंमलदार अनिल चव्हाण करीत आहेत.

जाहिरात

प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलीची आत्महत्या

कोल्हापूरातील उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. लोकांचा जीव वाचवणाऱ्या एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. अपूर्वा हेंद्रे असे तिचं नाव असून ती प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे याची कन्या आहे. आज सकाळी ताराबाई पार्क येथील डी मार्टच्या समोर ती बेशुध्द अवस्थेत सापडली होती.

जाहिरात

हे ही वाचा :  पुण्याहून निघालेली ST बस सुसाट असताना चालकाला हार्टअटॅक; मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून 25 प्रवाशांना वाचवलं

उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचे निधन झाले. शनिवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करून ती घरी परतली होती. पहाटेच्या सुमारस ती घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली. सकाळी अपूर्वा दिसत नसल्याने वडिलांनी शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली. त्याच वेळी पोलिसांना मिळालेल्या वर्दीवरून पोलीस वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात