कोल्हापूर, 02 ऑक्टोंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात मुले पळवून नेणारी टोळी आल्याची जोरदार अफवा पसरली आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं होत. दरम्यान काहींनी सोशल मीडियावर जिल्ह्यातील रेंदाळ या गावात मुले पळवून नेताना एका महिलेला पकडले असल्याची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने पालकांत चिंतेचे वातावरण पसरले. याबाबत हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, निवृत्ती माळी यांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुले पळवणाऱ्या टोळीबाबत सध्या सर्वत्र अफवा पसरल्या आहेत . त्यामुळे या भागातील शाळांनीही खबरदारी घेतली आहे. पालकांना सूचना दिल्या आहेत. या अफवा की सद्यस्थिती याबाबत लोकांत संभ्रमावस्था असताना शुक्रवारपासून सोशल मीडियावर रेंदाळ येथून मुले पळवून नेताना एका महिलेला पकडल्याची पोस्ट फोटोसह टाकण्यात आली. ही पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे पालकांत चिंता पसरली. मात्र, याबाबत खात्री केली असता तो फोटो आणि पोस्ट फेक असल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : कोल्हापूर हादरून टाकणारी घटना, बापाने अल्पवयीन मुलीशी ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध
अफवा पसविणारी पाेस्ट टाकणार्याचा शाेध सुरु
यासंदर्भात हुपरी पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर अशाप्रकारे बेजबाबदार पोस्ट टाकणे, गुन्हा आहे. ही पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेऊ, असे त्यांनी सांगितले.
लहान मुलं पळवणारी म्हणून बुरखाधारी प्रियकराला मारहाण
साताऱ्यात प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणान अक्कल चालवत जुगाड केले. हे जुगाड करण त्याला चांगलच महागात पडल आहे. मुलं पळवणारी व्यक्ती समजून या प्रियकराची लोकांनी धुलाई केली आहे. काल (दि. ३०) सकाळच्या दरम्यान तामजाईनगर परिसरात ही घटना घडली. पोरं पळवून नेणारी टोळीतील माणूस असल्याच्या संशय मनात धरत स्थानिकांनी ताब्यात चांगलाच चोप दिला. ही बाब सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर संशयीतास त्यांनी ताब्यात घेतले. चौकशीत गडी लव्हरला भेटायला बुरख्याच्या वेशात गेल्याचे समोर आले.
हे ही वाचा : कोल्हापुरात भर चौकात कुख्यात गुंडाचा थरारक पाठलाग करत दगडाने ठेचून खून
सातारा शहरातील तामजाईनगर परिसर हा वर्दळीचा आहे. या परिसरात शाळा असल्याने लहान मोठी मुले शाळेत जात होती. याचदरम्यान एक बुरखाधारी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होता. बुरखा घातलेली महिला ती पुरुषासारखी चालत असल्याचे काही महिलांनी लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला घेरण्यात आले.