जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Rape Case : कोल्हापूर हादरून टाकणारी घटना, बापाने अल्पवयीन मुलीशी ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध

Kolhapur Rape Case : कोल्हापूर हादरून टाकणारी घटना, बापाने अल्पवयीन मुलीशी ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध

Kolhapur Rape Case : कोल्हापूर हादरून टाकणारी घटना, बापाने अल्पवयीन मुलीशी ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध

कोल्हापूरमध्ये बालविवाह करत गर्भवती केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कोल्हापुरात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. (Kolhapur Rape Case)

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 25 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे  दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बालविवाह करत गर्भवती केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कोल्हापुरात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीला लागून असणाऱ्या गावात धक्कादायक घटना घडल्याने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

जाहिरात

विकृत बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर हा धक्कादायक समोर आला. याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास राळेभात करत आहेत.

हे ही वाचा :  धक्कादायक! कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, रुग्णालयात गेल्यानंतर भयानक वास्तव समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापाने पीडित अल्पवयीन मुलीशी मागच्या दोन वर्षांपासून म्हणजे 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. दरम्यान ती त्याची मुलगी असूनही त्याने  तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित मुलीला दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यानंतर गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडिताने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत दोन मोठ्या घटना

कोल्हापुरात काल रात्री एका कुख्यात गुंडाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. थरारक पद्धतीने हा खून करण्यात आल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. दौलतनगरमधील गुंडाचा यादवनगरमध्ये पाठलाग करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल(दि. 24) शनिवारी रात्री उशिरा घडली. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Dhairyasheel Mane Mother : खासदार धैर्यशील मानेंच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा, अटकेसाठी फिर्यादीचा ठिय्या तरीही कारवाई नाही

कोल्हापूर शहराती कुख्यात गुंड असलेला चिन्या हळदकर याचा काल रात्री खून करण्यात आला. दरम्यान या घटनेने राजारामपूरी परिसरासह शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. चार मारेकर्‍यांनी थरारक पाठलाग करून त्याला दगडाने ठेचले. यादवनगर येथील महावितरण कार्यालयासमोरील चौकात ही थरारक घटना घडली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात