कोल्हापूर, 13 जुलै : मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार (Kolhapur rain update) पावसाने नद्या इशारा पातळीच्या बाहेर गेल्या आहेत. (Kolhapur panchaganga river flood) पंचगंगा नदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने नद्यांजवळील गावांना जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून स्थलांतराचा आदेश देण्यात आला आहे. (Kolhapur heavy rainfall) दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. (Kolhapur rain river water level hike) दोन दिवसांपूर्वी 31 फुटांवर पंचगंगा नदीची पातळी होती झालेल्या पावसाने तब्बल 4 फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे लवकरच पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Kolhapur imd red alert)
कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर होणाऱ्या पावसाने पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. मागच्या 24 तासांता तब्बल 2 फुटांनी वाढ होत पाणी पातळी 34 फुटांवर गेली. बारा नद्यांवरील एकूण 53 बंधारे पाण्याखाली गेले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. कालपासून सुरू झालेल्या पावसाने आज सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती.
हे ही वाचा : ठाकरेंना शिंदे सरकारचा आणखी एक धक्का! बुलेट ट्रेन संदर्भात मोठी बातमी हाती
दरम्यान काल सायंकाळी पंचगंगेचे पाणी शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धामणी नदीवरील आंबर्डे बंधाऱ्यावर तसेच कुंभी नदीवरील गोठे पुलावर पाणी आल्याने धामणी खोऱ्यातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. टेकवाडीला (ता. गगनबावडा) पुराचा वेढा पडला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काल (दि.12) मंगळवारी रेड अलर्ट दिला होता. सकाळपासूनच धुवाँधार पाऊस सुरू होता. दुपारी बारानंतर पावसाने उसंत घेतली. गेल्या चार पाच दिवसांनंतर प्रथमच काही काळ सूर्यदर्शन झाले. पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. पावसाचा जोर पुन्हा काहीसा कमी झाला. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतच आहे.’
हे ही वाचा : सीएम शिंदेंना गुरू पोर्णिमेलाच धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरेंचा विसर, चर्चेला उधाण
पंचगंगेची पाणी पातळी यावर्षी आतापर्यंत 33 फूट 1 इंचांपर्यंत जाऊन 30 फूट 7 इंचांपर्यंत कमी झाली होती. सोमवारपासून पुन्हा वाढ सुरू होत, रात्री 12 वाजता ही पातळी 33 फुटांवर गेली. मंगळवारी सकाळी सात वाजता ती 33 फूट 7 इंच झाली. दुपारी दोन वाजता पाणी पातळी 34 फूट झाली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आहे. पावसाचा जोर वाढला आहे. तो कायम राहिला, तर दोन दिवसांत पंचगंगा इशारा पातळी गाठेल, अशी शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवार, दि. 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. या कालावधीत जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

)







