मुंबई, 13 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanth shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी (shiv sena 40 mla rebel) करत शिवसेनेत उभी फूट पाडली. या 40 आमदारांसह अन्य 10 आमदार मिळून भाजपसोबत (cm shinde group and bjp alliance) युती करत सत्ता स्थापन केली. दरम्यान एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. बंडखोरी करायचीच होती तर समोर येऊन बोलायचं असाही आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. (shiv sena criticize eknath shinde) ज्या भाजपने शिवसेनेला (bjp vs shiv sena) खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्या भाजपला जाऊन मिळणे कितपत योग्य हाही सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही कधीही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाहीच आणि करणारही नाही असे वारंवार सांगितले आहे. दरम्यान त्यांच्या आजच्या गुरू पोर्णिमेच्या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे. (eknath shinde guru Poornima tweet)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर माध्यमांसमोर आल्यावर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाहीच आम्ही आनंद दिघे आणि शिवसेनेच्या शिकवणीवर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाऊ असे वारंवार सांगितले. दरम्यान त्यांनी आज गुरु पोर्णिमे निमीत्त ट्वीट केले आहे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे आणि धनुष्यबाणाचा कुठेही उल्लेख नसल्याने त्यांना उद्धव ठाकरेंसोबत धनुष्यबाणाचाही विसर पडला का? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन...#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
हे ही वाचा : मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री शिंदेंकडून मदत; ठाकरेंच दुर्लक्ष?
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन… अशा आशयाचे ट्वीट करत गुरु पोर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी आलेल्या धर्मवीर चित्रपटातही गुरूपोर्णिमेचे महत्व उल्लेखनीय दाखवण्यात आले होते. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांना शोधत गुरूपोर्णिमेनिमीत्त गुरूंचे पाय पूजन करतानाचा सिन दाखवण्यात आला आहे.
हे ही वाचा : मुर्मूंना पाठींबा दिल्याने काँग्रेसला धक्का? पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही तर.. थोरातांच्या ट्विटने वेधलं लक्ष
मातेश्रीबाहेर मृत्यू झालेल्या वक्तीला मुख्यमंत्र्याकडून मदत
शिवसेना पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. याच दरम्यान, एक दुःखद घटना घडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना 3 लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. यातील 1 लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी आज काळे कुटूंबियांना सुपूर्द केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील शिंदे यांनी स्वीकारले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)