मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Rain Update : कोल्हापूरकरांचा धोका वाढला पाणी पातळीत वाढ, राधानगरी धरणाचा 1 स्वयंचलित दरवाजा उघडला

Kolhapur Rain Update : कोल्हापूरकरांचा धोका वाढला पाणी पातळीत वाढ, राधानगरी धरणाचा 1 स्वयंचलित दरवाजा उघडला

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने काल रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने काल रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने काल रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली.

  कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान आज सकाळी आज (दि.10) सकाळी 5.30 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले. (Kolhapur Rain Update)या दरवाज्यातून 1428 क्युसेक्स विसर्ग व पाॅवर हाऊसमधूनचा 1600 असा एकूण 3028 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली. दरम्यान राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने काल रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच आहे. राधानगरी धरण काठोकाठ भरल्याने धरणाचा 6 वा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. चित्री आणि कडवी ही आणखी दोन धरणे मंगळवारी भरल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंचगंगा यावर्षी प्रथमच इशारा पातळीवर गेली. यामुळे जिल्ह्याला महापुराचा धोका कायम आहे.

  हे ही वाचा : Cabinet Expansion : शिंदेंच्या टीममध्ये एकही महिला मंत्री नाही, असं आहे मिनी मंत्रिमंडळ!

  पावसाने उघडीप दिली असली तरी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकलीसह तीन ठिकाणी आलेले पाणी पूर्ण ओसरलेले नाही. यामुळे आजही हा मार्ग वाहतुकीसाठी बंदच होता. कोल्हापूर-राजापूर मार्गावर करंजफेणजवळ आलेले पाणीही ओसरल्याने अणुस्कुरा घाटातून होणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली. सकाळी काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून कोसळणारी सर वगळता पावसाची संततधार नव्हती. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पातळीत संथ वाढ सुरूच आहे.

  तुळशी वगळता सर्वच धरणांतून विसर्ग

  जिल्ह्यातील तुळशी वगळता उर्वरित सर्वच प्रमुख 14 धरणांतून आजही पाण्याचा विसर्ग सुरू होता. दूधगंगा धरणातून 2 हजार 465 तर वारणेतून सकाळी 2 हजार 953 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी तो वाढवून 5 हजार 628 क्यूसेक करण्यात आला. घटप्रभा धरणातून सकाळी 7 हजार 437 क्यूसेक विसर्ग सुरू होता. दुपारी तो 6 हजार 480 पर्यंत कमी करण्यात आला. कासारी धरणातून 1 हजार 90 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

  हे ही वाचा : मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातीही ठरली! फडणवीसांकडे दोन 'जम्बो' मंत्रिपदं?

  कोल्हापूर शहरासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी

  मंगळवारी सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 57.8 मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूर शहरात अतिवृष्टी झाली. 24 तासांत शहरात 84 मि.मी. पाऊस झाला. यासह गगनबावडा (100.2), पन्हाळा (88.6), शाहूवाडी (86), राधानगरी ( 79.8) व चंदगड (69.2 मि.मी.) या पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. हातकणंगले 42, शिरोळ 28.8, करवीरमध्ये 59.3, कागल 49.3, गडहिंग्लज 22, भुदरगड 53.5 तर आजऱ्यात 51.6 मि.मी. पाऊस झाला.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Radhanagari s13a272, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur

  पुढील बातम्या