मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Cabinet Expansion : शिंदेंच्या टीममध्ये एकही महिला मंत्री नाही, असं आहे मिनी मंत्रिमंडळ!

Cabinet Expansion : शिंदेंच्या टीममध्ये एकही महिला मंत्री नाही, असं आहे मिनी मंत्रिमंडळ!

एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण, या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीत.

एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण, या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीत.

एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण, या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीत.

    मुंबई, 09 ऑगस्ट : अखेर 39 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण, या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त टीकास्त्र सोडले आहे. शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडला आहे. एकूण 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात शपथ दिली. पण, यावेळी एकाही महिलेला संधी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, अशी टीका सुळे यांनी केली. (मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया) तसंच, सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांची केली पाठराखण सुद्धा केली. संजय राठोड वर सर्वात जास्त आरोप भारतीय जनता पक्षाने केले आहे. आम्ही कुठल्या प्रकारचे आरोप केले नाहीत. भारतीय जनता पक्षाने बेभान आरोप करत संजय राठोड यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही सुळेंनी केली. (राठोडांना मंत्रिमंडळात का घेतलं? विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया) 'राज्यात आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आमचे जास्तीत जास्त सहकारी भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळामध्ये समावेश केला आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे मनःपूर्वक आभार आभारी आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्या हिऱ्यांना खरी ओळख दिली आहेत. यामुळे आमच्या पक्षात असलेले आमच्या सोबत सहकारी असलेल्या लोकांनाच मंत्रिमंडळ मध्ये स्थान देण्यात आला आहे .यामुळे मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करते, असा टोलाही सुळेंनी लगावला. कसं आहे मंत्रिमंडळ ? पश्चिम महाराष्ट्र - चंद्रकांत पाटील सुरेश खाडे शंभूराजे देसाई उत्तर महाराष्ट्र - गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित गुलाबराव पाटील दादा भुसे मराठवाडा - अतुल सावे संदिपान भुमरे अब्दुल सत्तार तानाजी सावंत विदर्भ - सुधीर मुनगंटीवार संजय राठोड कोकण - उदय सामंत दीपक केसरकर मुंबई - रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या