मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kolhapur Raid NIA ATS : कोल्हापुरात पीएफआय संघटनेच्या एकाला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर

Kolhapur Raid NIA ATS : कोल्हापुरात पीएफआय संघटनेच्या एकाला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयावरून काल(दि.22) कोल्हापूरात जवाहनगर आणि सुभाषनगरात छापा टाकण्यात आला. (Kolhapur Raid NIA ATS)

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयावरून काल(दि.22) कोल्हापूरात जवाहनगर आणि सुभाषनगरात छापा टाकण्यात आला. (Kolhapur Raid NIA ATS)

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयावरून काल(दि.22) कोल्हापूरात जवाहनगर आणि सुभाषनगरात छापा टाकण्यात आला. (Kolhapur Raid NIA ATS)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 23 सप्टेंबर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयावरून काल(दि.22) कोल्हापूरात जवाहनगर आणि सुभाषनगरात छापा टाकण्यात आला. (Kolhapur Raid NIA ATS) यामध्ये कोल्हापुरातील एका हस्तकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्यावर मागच्या कित्येक वर्षांपासून संशय व्यक्त केला जात होता. ‘एनआयए’ व ‘एटीएस’च्या ‘रडार’वर आलेल्या आणि देशभर व्यापलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयातून नवी दिल्ली व नाशिकमधील पथकाने त्या संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरच्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ला येथील साहिल अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला. यामध्ये राहणाऱ्या मौला नबीसाब मुल्ला (रबी सहाब मुल्ला) (वय 38) याला अटक करण्यात आली आहे. मौला मुल्ला हा ग्राफीक्स डिझायनरचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

हे ही वाचा : NIA चा PFI वर 'सर्जिकल स्ट्राईक', प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा...

पीएफआय संघटनेविरोधात एटीएसच्या पथकाने एकाचवेळी देशभर छापेमारी केली यामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान त्याला नाशिक येथील न्यायालयाने 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मौला हा मुळचा कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ल्यातून संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही माहिती मिळताच परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते.

संशयित मुल्लाने डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरसह परिसरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संशयितावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची कारागृहातही रवानगी करण्यात आली होती. राजारामपुरी पोलिसांचा डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर लक्ष होते.

संशयिताचे वडील नबीसाब मुल्ला हे मूळचे कर्नाटकातील. उदरनिर्वाहासाठी मुल्ला कुटुंब 45 वर्षांपूर्वी उचगाव येथील मणेर मळ्यात वास्तव्याला आले. नबीसाब मुल्ला यांना दोन मुले. संशयित मौला ग्राफीक्स डिझायनर असून, त्याने अभियांत्रिकी शिक्षणही घेतले. आई, वडील व त्याचा भाऊ मणेर मळ्यात राहतात. तर संशयित मौला हा पत्नी, मुलांसमवेत सिरत मोहल्ला परिसरात साहिल अपार्टमेंटमध्ये राहत होता.

हे ही वाचा : रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

विक्रमनगर येथील वादग्रस्त पोस्टरप्रकरणी राजारामपुरीचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी संशयित मौला मुल्लाला अटक करून चौकशीसाठी उचगाव येथील मणेर मळ्यात नेले होते. मौलाच्या वडिलांकडून माहिती घेत असताना संशयिताने पोलिस वाहनावर स्वत:चे डोके आपटून घेत आरडाओरड केली. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या दोन-अडीचशेवर तरुणांनी गर्दी करून पोलिस अधिकार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

First published:
top videos

    Tags: ATS, Kolhapur, Nia, Police, Raid