जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नको ते धाडस करू नका! पूर पाहण्यास गेले अन् 5 तरुण नाल्यात वाहून गेले

नको ते धाडस करू नका! पूर पाहण्यास गेले अन् 5 तरुण नाल्यात वाहून गेले

नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेल्या 5 तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेल्या 5 तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेल्या 5 तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 14 जुलै : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच 5 तरुण नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता, त्यांचा तोल गेल्याने पाचही तरुण नाल्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेले. या बाबत ची माहिती कळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पाच युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. वाहून गेलेल्या चौघांचा शोध सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसान धुमकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेल्या 5 तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पुरात वाहुन गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे (वय २४ वर्ष), संजू बागळे (वय २७ ) दोघे राहणार तुमखेडा, जावेद अली हजरत अली सैययद (वय २४ )आणि बाबा उर्फ रेहान कलीम शेख वय ( १५ ) दोघे ही राहणार गौतमनगर गोंदिया असे आहेत. तर सागर परतेती (वय २८ वर्ष) याला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. ( जीवापेक्षा सेल्फी हवा! पुरात बुडूनही पाण्याबाहेर हात ठेवून शूट करत राहिली VIDEO ) वाहून गेलेल्या चौघांचा शोध सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू राहिली मात्र कोणाचा ही शोध लागलेला नाही. आज पुन्हा शोध मोहीम सुरू करून चौघांचा शोध घेणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिस्थिती पाहता गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्हा वासियांना आदेश दिले आहे. जिल्ह्यात सध्या आणखी काही दिवस पाऊस सुरू असणार त्यामुळे नागरिकांनी नदी नाल्याकडे जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात