मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Panhala Indian Army : भारतीय सैन्य दलातील जवानाने उचललं टोकाचं पाऊल, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Kolhapur Panhala Indian Army : भारतीय सैन्य दलातील जवानाने उचललं टोकाचं पाऊल, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या काखे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या काखे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या काखे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 20 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या काखे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या तरून जवानाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे परंतु आत्महत्येच अद्यापही कारण समोर आले नाही, सत्यजीत खुडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पन्हाळा तालुक्यातील सत्यजित महादेव खुडे (वय 28) या लष्करी जवानाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (दि.19) गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या घटनेची माहिती सगळीकडे पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती. याचबरोबर सत्यजीतने असे टोकाचे पाऊल का उचललं याबाबत सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

हे ही वाचा : कपलच्या 'लपाछपी'चा भयंकर शेवट! खेळाखेळात GF चा असा डाव की BF जगातूनच 'आऊट'

याबाबत कोडोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सत्यजित खुडे हे गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. यावर्षी (दि. 1) जानेवारी ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते.

सत्यजित हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांचा भाऊ सुनील हा सत्यजित यांना उठविण्यासाठी गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 

हे ही वाचा : विम्याचे 7 कोटी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याचं कांड; रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव, पण त्या गोष्टीमुळे पोलखोल

सत्यजित यांना तातडीने उपचारासाठी कोडोली येथील यशवंत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सत्यजित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Suicide case, Suicide news