मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कपलच्या 'लपाछपी'चा भयंकर शेवट! खेळाखेळात GF चा असा डाव की BF जगातूनच 'आऊट'

कपलच्या 'लपाछपी'चा भयंकर शेवट! खेळाखेळात GF चा असा डाव की BF जगातूनच 'आऊट'

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

गर्लफ्रेंडसोबत लपाछपी खेळताना बॉयफ्रेंडचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 19 जानेवारी : लपाछपी किंवा लपंडाव तुम्ही खेळला असालय. हा खेळ खेळायला जितकी मजा येते तितकाच तो सावधपूर्वक खेळला जायला हवा. एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. अगदी जीवही जाऊ शकतो. लपंडाव खेळताना मृत्यू झाल्याची काही प्रकरणंही आहेत. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. कपलच्या लपाछपीत गर्लफ्रेंडच्या एका चुकीमुळे बॉयफ्रेंडचा जीव गेला आहे.

फ्लोरिडातील हे प्रकरण आहे. सारा बून आणि जॉर्ज टोरेस ज्युनिअर हे कपल विंटर पार्कमधील घरात लपाछपी खेळत होतं. दोघंही नशेत होते. हा खेळ खेळताना जॉर्जचा मृत्यू झाला. साराने लपाछपीदरम्यान जॉर्जचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात जॉर्जच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं आहे.

हे वाचा - शेजारी झोपलेल्या Boyfriend ने अंथरूणात लघवी केल्याने Girlfriend ची सटकली; रागात उचललं धक्कादायक पाऊल

या व्हिडीओत जॉर्ज एका सुटकेसमध्ये आहे. त्या सुटकेसमधून त्याचा आवाज येतो आहे. "मी आत श्वास घेऊ शकत नाही आहे", असं तो ओरडतो आहे. यानंतर सारा त्याला, "तू माझ्यासाठी जे काही केलं, त्यासाठी.... मूर्खा." असं म्हणते. जॉर्ज तिला पुन्हा पुन्हा सांगतो की, "मी नीट श्वास घेऊ शकत नाही आहे". सारा त्याला, "ते आता तुझ्यावर आहे. तू जेव्हा मला फसवतो तेव्हा मलाही असंच वाटतो." तुला तुझी बकवास बंद करायला हवी असं म्हणते.

रिपोर्टनुसार सारा आपल्या बॉयफ्रेंडला सुटकेसमध्ये तसंच सोडून झोपायला जाते. तो स्वतःच बाहेर येईल असं तिला वाटतं. थोड्या वेळासाठी ही सर्व मजा वाटत होती. पण लपाछपीच्या खेळाचा भयावह शेवट झाला.  सारा दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. तेव्हा जॉर्ज खाली असेल असं तिला वाटलं. पण तो नव्हता.  तिनं सुटकेस उघडून पाहिली. तो काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. तेव्हा तिने 911 क्रमांकावर फोन केला.

हे वाचा - धुळे हादरलं! खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरलं अन् क्षणभरात गेला जीव, VIDEO

फोनवर तिने सांगितलं, "मी आणि माझा बॉयफ्रेंड रात्री खेळत होतो. लपाछपी खेळाप्रमाणे मी त्याला एका सुटकेसमध्ये बंद केलं. त्यानंतर झोपायला गेले. सकाळी उठून पाहिलं तर सुटकेसमध्ये तो मृत होता. काय झालं मला माहिती नाही"

त्या कॉलची तपासणी करण्यासाठी पोलीस तिच्या घरी पोहोचले. तेव्हा निळ्या रंगाचं सुटकेस जमिनीवर पडलेलं होतं. फेब्रुवारी 2020 मधील हे प्रकरण आहे. दरम्यान कोर्टाने साराला समन्स पाठवला आहे.  या घटनेच्या दोन वर्षांनंतर ३० जानेवारीला प्री-ट्रायल सुनावणीसाठी सारा हजर राहणार आहे.

First published:

Tags: Couple, Crime, Death, World news