हैदराबाद 20 जानेवारी : एका सरकारी अधिकाऱ्याने 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा रकमेचा दावा करण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा खोटा बनाव केला. ही घटना तेलंगणामधील असून आरोपी, त्याची पत्नी आणि दोन नातेवाईकांसह चार जणांना मेडक जिल्ह्यात अटक करण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. मुख्य आरोपी तेलंगणा राज्य सचिवालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) म्हणून काम करत होता.
शेअर बाजारात या व्यक्तीचं 85 लाखांचं नुकसान झालं आणि त्यानंतर त्यांनी पत्नी आणि नातेवाईकांसह एक योजना बनवली. तोटा भरून काढण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी त्याने एका व्यक्तीचा कथितपणे खून केला आणि विम्याच्या रकमेचा दावा करण्यासाठी आपल्याच मृत्यूचं नाटक केलं.
कपलच्या 'लपाछपी'चा भयंकर शेवट! खेळाखेळात GF चा असा डाव की BF जगातूनच 'आऊट'
8 जानेवारी रोजी एएसओने अन्य एका आरोपीसह निजामाबाद रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीला सोबत येण्यास सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की या दोघांनी त्या व्यक्तीचं मुंडन केलं, त्याला अधिकाऱ्याचा गणवेश घातला आणि नंतर त्याला व्यंकटपूर गावात नेलं. यानंतर एएसओने कारच्या आत आणि बाहेर पेट्रोल टाकलं आणि त्या व्यक्तीला कारच्या पुढील भागात बसण्यास सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा त्यांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने आणि लाठीने हल्ला केला आणि त्याला ठार मारलं, नंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि गाडी पेटवून दिली.
योजनेचा एक भाग म्हणून, अधिकाऱ्याने आणि इतरांनी विम्याच्या रकमेचा दावा करण्यासाठी त्याच्या सारख्याच व्यक्तीला मारण्याची योजना आखली. पोलिसांनी सांगितलं की, त्याने गेल्या एका वर्षात त्याच्या नावावर 7.4 कोटी रुपयांच्या 25 विमा पॉलिसी घेतल्या.
तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एक जळालेली कार सापडली होती, त्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह तेलंगणा राज्य सचिवालयातील सहाय्यक विभाग अधिकारी धर्माचा असल्याचे गृहीत धरले होते, परंतु या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले, कारण पोलिसांना तो अधिकारी जिवंत सापडला.
इंजीनिअर झाली, नोकरी मिळाल्यावर टाळायला लागली गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडने घेतली मौलानाची मदत, घडलं भयानक
धर्माला गोव्यातून अटक करून हैदराबादला आणण्यात आले होते. मेडक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 9 जानेवारी रोजी जिल्ह्यातील व्यंकटपूर गावाच्या हद्दीत एका व्यक्तीच्या जळालेल्या मृतदेहासह एक पूर्णपणे जळालेली कार सापडली होती. कारजवळ पेट्रोलची अर्धी भरलेली बाटली आणि बॅग आढळून आली. कारचा नोंदणी क्रमांक आणि बॅगेत सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख 48 वर्षीय धर्मा अशी केली होती .
रेलिंग नसल्याने कार खड्ड्यात पडली असावी, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला. या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा आले जेव्हा पोलिसांनी तपासादरम्यान धर्माचा मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल फोनच्या सिग्नलच्या आधारे डिव्हाईस गोव्यापर्यंत ट्रॅक झालं.
पोलिसांचं पथक गोव्यात पोहोचले आणि धर्मा जिवंत सापडला. त्याला ताब्यात घेऊन तेलंगणात आणण्यात आलं. धर्माने विम्याच्या रकमेसाठी त्याच्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी कार चालकाची हत्या केल्याचा आरोप आहे. सट्टेबाजीमुळे तो कर्जबाजारी झाला होता आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी विम्याच्या रकमेवर दावा करण्याचा विचार त्याने केला होता. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याची साथ दिली .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance, Shocking news