कोल्हापूर, 31 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें च्या बंडखोरीनंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद सध्या महाराष्ट्रात सुरूय. याच दरम्यान आता वेगवेगळ्या भागातील शिवसेनेतील नेते शिंदे गटात जात येत असल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापुरातही आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जयसिंपुरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेते मोठी फूट पडली असून अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या सेनेत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिंदे यांच्या सोबत जिल्ह्यातील राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची भूमिका तळ्यात होती. सुरुवातील उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, नंतर विकास कामांसाठी शिंदे यांच्यासोबत राहणे फायदेशीर असल्याचं सांगत खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने या दोन्ही खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. वाचा - ‘..नाहीतर तोडफोड करून बाहेर पडणार’, रवी राणांसोबतच्या वादावरुन बच्चू कडूंचा इशारा जयसिंपुरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेते फूट दोन मोठे खासदार शिंदे गटात गेल्यानंतर कोल्हापुरात मोठं आंदोलन झाले होते. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यातील गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. जयसिंपुरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते मोठी फूट पडली आहे. अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. तालुका प्रमुख सतीश मलमे यांच्यासह अनेक जणांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला दुसरा जबर दणका बसला असून त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.
आमदारांसोबत खासदारही शिंदे गटात.. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापुरातील शिवसेनेचे तत्कालिन राज्यमंत्री, आमदार यांच्यापाठोपाठ दोन्ही खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्यानंतर खासदार संजय मंडलिक व खासदार माने हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले. यापूर्वी आबिटकर यांच्या घरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या मेार्चात खासदार मंडलिकही सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनीच बंडखोरी केली.