ज्ञानेश्वर साळुंखे (कोल्हापूर) 06 जानेवारी : देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या श्री जोतिबा मंदिराच्या विविध राज्यांसह जिल्ह्यात असणाऱ्या जमीनींमध्ये घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. जोतिबा देवस्थानचे प्रस्थ मोठे असल्याने विविध राज्यात या देवस्थानच्या जमीनी आहेत दरम्यान सातारा, गोवा व कर्नाटक राज्यात असणारी सुमारे साडेतीनशे ते चारशे एकरपैकी दोनशे ते अडीचशे एकर जमिनीची परस्पर विक्री केल्याची माहिती समोर येत आहे.
या जमीनींचे व्यवहार झाले आहेत त्या जमीनींच्या 7/12 वर जोतिबा देवस्थानचे नाव तसेच आहे परंतु ज्यांनी जमीनी घेतल्या आहेत त्यांची नावे इतर हक्कात लागली आहेत. यातील काही जणांनी जमीनी विकल्या आहेत तर काहीजन ह्या जमीनी आपल्याकडे ठेवल्या असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती दैनिक सकाळमध्ये देण्यात आली आहे.
हे ही वाचा : औरंगजेब क्रूर असता तर… वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांची आणखी एक चूक
याबाबत कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गंभीर दखल घेतली आहे. जोतिबा देवस्थानच्या अशा जमिनीचा शोध घेऊन या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात घेणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचीव शिवराज नायकवाडे यांनी दिली.
श्री जोतिबा मंदिर समितीच्या नावावर कोल्हापूर परिसरात सुमारे चारशे एकर जमीन आहे. तर बाकीची उर्वरित तीनशे ते चारशे एकर जमीन कर्नाटक, गोवा, कोकण, सातारा या भागात आहे. येथून जोतिबा मंदिरासाठी खंड येतो. मात्र, या जमिनी नेमक्या कोणाच्या ताब्यात आहेत. याची नोंद मात्र दिसून येत नाही. जेथे जमिनी आहेत. त्या ठिकाणच्या सातबारा उताऱ्यावर जोतिबा मंदिराचे नावे आहे. खंड देऊन ही जमीन कसायला घेतली आहे. वर्षानुवर्ष जोतिबाची ही जमीन याच लोकांकडे आहे.
हे ही वाचा : ‘संभाजीराजेच शंभूराजेंना धर्मवीर पदवी लावू नका सांगायचे..’, इतिहास संशोधक सावंत यांची भूमिका म्हणाले..
याचा फायदा घेत, अनेकांनी कसायला असणारी जमीनच इतरांना परस्पर विक्री केली आहे. यामध्ये धनदांडगे, राजकीय, उद्योजक आणि जमीनदारांचा समावेश आहे. वर्षांनुवर्षं ताब्यात असलेली जमीन आपल्याच मालकीची म्हणून दुसऱ्या पिढीतील जमीन करणाऱ्यांनी मनमानी कारभार केला आहे. इतर हक्कातील नावाचा आधार घेत इतरांनाही जमीन विक्री केली आहे.

)







