जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'संभाजीराजेच शंभूराजेंना धर्मवीर पदवी लावू नका सांगायचे..', इतिहास संशोधक सावंत यांची भूमिका म्हणाले..

'संभाजीराजेच शंभूराजेंना धर्मवीर पदवी लावू नका सांगायचे..', इतिहास संशोधक सावंत यांची भूमिका म्हणाले..

इतिहास संशोधक सावंत यांची भूमिका म्हणाले..

इतिहास संशोधक सावंत यांची भूमिका म्हणाले..

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन सुरू असलेल्या वादावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी भूमिका मांडली आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 2 जानेवारी : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक आहे, असं वक्तव्य केलं होतं. छत्रपती संभाजीराजे यांनी यावर आक्षेप घेत अजित पवारांवर टीका केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याला संरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्याचे रक्षण केले. त्यामुळे संभाजीराजे धर्मरक्षकही असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. यावर आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनीही आपली भूमिका मांडली आहे. काय म्हणाले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत? संभाजीराजे छत्रपती यांनी धर्मवीर ही पदवीच शंभूराजेंना योग्य आहे, म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनीच संभाजीराजे छत्रपती हे शंभूराजे यांना धर्मवीर ही पदवी लावू नका, अशी संभाजीराजे यांनीच यापूर्वी भूमिका मांडल्याचे म्हटल आहे. त्या ऐवजी स्वातंत्रवीर म्हणा असे संभाजीराजे अनेक भाषणातून म्हणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आता सनातन की महाराष्ट्र धर्म यापैकी कोणता धर्म अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. संभाजीराजे हे  शाहू महाराजांचे वारस आहेत. त्यांना महाराष्ट्र धर्म चालवावा हा शाहूंनी सांगितलेला संदेश त्यांना अभिप्रेत असावा, असंही इंद्रजित सावंत यांनी यावेळी म्हटलं आहे. वाचा - औरंगजेब क्रूर असता तर… वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांची आणखी एक चूक काय म्हणाले होते अजित पवार? स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. त्यामुळे त्यांना धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक म्हणायला हवं, असे ते म्हणाले होते.

News18लोकमत
News18लोकमत

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले? मी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवातीला संभाजीराजेंना मी धर्मवीर म्हणून संबोधतो. यापुढेही ते असेच राहणार आहे. अजित पवार म्हणतात संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. मात्र, संभाजीराजे धर्मवीर आहेत याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुस्तकाचे वाचन करून ते फक्त स्वराज्य रक्षक म्हटलं हे सांगावे. अजित पवार अर्धसत्य बोलले आहेत. ऐतिहासिक संदर्भ देताना पुस्तके वाचून द्यावे, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात