जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगजेब क्रूर असता तर... वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांची आणखी एक चूक

औरंगजेब क्रूर असता तर... वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांची आणखी एक चूक

औरंगजेब क्रूर असता तर... वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांची आणखी एक चूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर वाद व्हायच्या आधीच जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं पण यात त्यांनी आणखी एक चूक केली.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 2 जानेवारी : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं. अजित पवारांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला, तसंच भाजपने अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली. अजित पवारांची बाजू लावून धरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी वादग्रस्त विधान केलंय. या वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली, पण त्यातही जितेंद्र आव्हाड यांनी चूक केली. ‘संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचं मंदीर होतं, ते औरंगजेबाने तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदीर तोडलं असतं ना,’ असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. या विधानामुळे वाद होईल हे लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी लगेचच पत्रकारांना बोलावून पुन्हा प्रतिक्रिया देत औरंगजेब क्रूर होता, अशी सारवासारव केली, पण ही सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. औरंगजेबाचा मृत्यू नगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झाला होता, पण औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूबाबत आपण चुकीची माहिती दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलं आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं, ज्यात ते औरंगजेब क्रूर होता, असं म्हणत आहेत. ‘औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवलं आहे. त्याने भावाला, वडिलांना मारलं आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होता. स्वत:च्या राज्य रचनेकरता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता, पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही,’ असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

आव्हाडांचा भाजपला सवाल भाजपवर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी सावरकर आणि गोळवलकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केला. अजितदादांनी कसली माफी मागावी? उलट भाजपने माफी मागावी. जेम्स लेनबाबत माफी मागावी, सावरकरांनी लिहिलंय त्याबाबत माफी मागावी, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात