कोल्हापूर, 28 सप्टेंबर : नवरात्रीमुळे मागच्या दोन दिवसांपासून अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी होत आहे. दरम्यान लाखो भावीक येत असल्याने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंदीर परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. अंबाबाई मंदिरात महिला भाविकाचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुख दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र सोनबत्ती जाटब या महिलेने चलाखीने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. जुना राजवाडा पोलिसांत याची नोंद होताच तात्काळ पोलिसांनी चोरट्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्यासाठी काही महिला सक्रीय झाल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांच्या दर्शन रांगेसाठी मोठी गर्दी असल्याने महिला दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला टाकण्यात आला. दरम्यान ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने चोरी केलेल्या महिलेचा चेहरा लक्षात आला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिरात महिला भाविकाचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली pic.twitter.com/hSb9Z9FAUn
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) September 28, 2022
हे ही वाचा : कोल्हापूर हादरून टाकणारी घटना, बापाने अल्पवयीन मुलीशी ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध
अंबाबाई मंदिरात महिला भाविकाचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुख दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र सोनबत्ती जाटब या महिलेने चलाखीने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. जुना राजवाडा पोलिसांत याची नोंद होताच तात्काळ पोलिसांनी चोरट्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे.
अंबाबाई मंदिरात घटस्थापनेचा मुहूर्त साधला
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीचे सिंहासनारुढ अलौकिक रूप डोळ्यात साठवत भाविकांनी ‘अंबा माता की जय’चा गजर केला. अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेलाही सोमवारी 307 वर्षे पूर्ण झाली. 26 सप्टेंबर 1715 साली दसऱ्या दिवशी पुनर्प्रतिष्ठापना झाली होती.
हे ही वाचा : कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
सोन्याची अब्दागिरी अर्पण
करवीर निवासिनी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने सोमवारी श्री अंबाबाईला सोन्याची अब्दागिरी अर्पण केली. ५ किलो १८९ ग्रॅम चांदी आणि वर सोन्याचा मुलामा असलेली ही अब्दागिरी ३ लाख ८३ हजार किमतीची आहे. ट्रस्टच्या वतीने १ मे २०१७ रोजी सोन्याची पालखी, दोन मोर्चेल, चवऱ्या अर्पण केल्या होत्या. त्यातील अब्दागिरी राहिली होती. ती देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अरुंधती महाडिक, कार्याध्यक्ष भरत ओसवाल, सचिव महेंद्र इनामदार, शिवप्रसाद पाटील, दत्तम इंगवले, इंद्रजित पाटील उपस्थित होते.