मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Kagal NCP BJP : कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

Kolhapur Kagal NCP BJP : कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कागल शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. (Kolhapur Kagal NCP BJP)

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कागल शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. (Kolhapur Kagal NCP BJP)

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कागल शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. (Kolhapur Kagal NCP BJP)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 28 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कागल शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्ते जखमी झाल्याने दिवसभर वातावरण तंग झाले होते. कागल शहरातील शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये सोमवारी रात्री दुर्गामाता उत्सवावरून दोन्ही गटांच्या काही तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारामारीत झाले. बसस्थानकासमोरील एका दुकानासमोर रात्रीच्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 

कागल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. दरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले; मात्र परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कागल पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये दिवसभर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण होते.

हे ही वाचा : दहशतवादाविरोधात '28 सप्टेंबर'चं कनेक्शन; PFI वरील बंदीचा निर्णय सर्जिकल स्ट्राइकच्याच दिवशी

मिळालेल्या माहितीनुसार, कागल शहरातील शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये सोमवारी रात्री दुर्गामाता उत्सवावरून दोन्ही गटांच्या काही तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान दुसऱ्या दिवशी म्हणजे काल (दि.28) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारामारीत झाले. बसस्थानकासमोरील एका दुकानासमोर रात्रीच्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. मारामारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी कागल पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.

दोन्हीही गट एकमेकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक बनले होते. दिवसभर दोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करून होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता या मारामारी प्रकरणात नसलेली नावे काढून टाकण्यात यावी, यासाठी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बोलवून पोलिसांनी खरी नावे देण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून नसलेल्या लोकांची नावे वगळून गुन्ह्यात असलेली नावे देण्यासाठी उशिरापर्यंत खलबते सुरू होती.

गुन्ह्यामधील कलम मजकूर याबाबत देखील चढाओढ सुरू होती. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी वकिलाशी संपर्क साधून त्यांचाही सल्ला घेतला होता. त्यामुळे दिवसभर सुरू असलेल्या या नाट्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये कार्यकर्ते नागरिक यांची गर्दी झालेली होती.

हे ही वाचा : BREAKING : बच्चू कडूंना राग अनावर, पोलिसांमोरच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, VIDEO

पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवसभर गर्दी होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख तिरुपती काकडे, तसेच करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक सुप्रिया पाटील घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांबरोबर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

First published:

Tags: BJP, Kolhapur, NCP, हसन मुश्रीफ