कोल्हापूर, 23 जुलै : कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेत रात्रीच्या सुमारास एका युवकाने तब्बल तेरा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आज (दि.23) सकाळी जेव्हा नागरिकांनी या गाड्या पाहिला त्यावेळी अनेकांना धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी स्वप्निल तावडे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घरगुती वादाचा राग त्याने गल्लीतील गाड्यावर काढल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान यामध्ये कोणालाही जिवीत हाती झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Kolhapur Crime)
एका महिन्यात दुसरी घटना
यादवनगरात टोळक्याने हातात नंग्या तलावरी घेऊन वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान झालेल्या तोडफोडीमध्ये 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं.
हे ही वाचा : 'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..' नितेश राणेंचा गंभीर आरोप
यादवनगरातील प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यप्राशन केलेले एक टोळके मध्यरात्री यादवनगरात शिरले. त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या. टोळक्याने शिवीगाळ करीत तलवारीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. या वेळी भयभीत झालेल्या महिलांनी आरडाओरड केली. त्याने परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता.
कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेत एका युवकाने तब्बल तेरा गाड्यांची तोडफोड केली, घरगुती वादाच्या रागातून त्याने हे विचित्र कृत्य केलं pic.twitter.com/rJNiolWhfk
— News18Lokmat (@News18lokmat) July 23, 2022
यानंतर हल्लेखोरांना रोखण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले, तसा हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र, हल्ल्यात दहा ते बारा वाहनांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नुकसान झालेल्या वाहनांचा पंचनामा केला. त्यानंतर हल्लेखोरांचा शोध सुरू केला. यासंबंधी मोहसीन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे (वय ३०, रा. यादवनगर), शाहरूख मुराद मोमीन (२८, रा. सुभाषनगर) आणि चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : shiv sena saamana Editorial : शिवसेनेकडून भाजपचे ‘या’ कारणासाठी कौतुक, भाजपच्या शिडीवर ठेवलेले हे पहिले पाऊलच…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Police, Police arrest, कोल्हापूर