जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Crime : कोल्हापूरात गँगवॉर, वाढदिवसाचे फलक फाडल्याचा जुन्या वादातून पेट्रोलने घरच पेटवले

Kolhapur Crime : कोल्हापूरात गँगवॉर, वाढदिवसाचे फलक फाडल्याचा जुन्या वादातून पेट्रोलने घरच पेटवले

Kolhapur Crime : कोल्हापूरात गँगवॉर, वाढदिवसाचे फलक फाडल्याचा जुन्या वादातून पेट्रोलने घरच पेटवले

कोल्हापूर मागच्या तीन महिन्यांपासून दोन गटात राडा सुरू आहे. फुलेवाडी रिंग रोड येथे विजय उर्फ रिंकू देसाई आणि संतोष बोडके यांच्या गटात मागच्या कित्येक महिन्यांपासून वाद सुूरू आहे. (Kolhapur Crime)

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 17 ऑगस्ट : कोल्हापूर मागच्या तीन महिन्यांपासून दोन गटात राडा सुरू आहे. फुलेवाडी रिंग रोड येथे विजय उर्फ रिंकू देसाई आणि संतोष बोडके यांच्या गटात मागच्या कित्येक महिन्यांपासून वाद सुूरू आहे. (Kolhapur Crime) या वादातून दोन्ही गटातील लोकांवर वारही झाले आहेत. दरम्यान या वादातून काहीजणांना अटकही झाली आहे. दरम्यान काल पुन्हा रिंकू देसाई गटाच्या नितीन वरेकर याचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात

फुलेवाडी रिंग रोड येथील विजय ऊर्फ रिंकू देसाई समर्थक नितीन वरेकर याच्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील घरावर प्रतिस्पर्धी संतोष बोडके गटाने सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला केला. तसेच घरातील साहित्याची तोडफोड व जाळपोळ करून घर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान घरात असणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली. याचे पडसाद काल (दि.16) मंगळवारी दिवसभर परिसरात दिसत होते भागातील वातावरण तंग झाले होते.

हे ही वाचा :  Kolhapur Crime News : कोल्हापुरात जमीनीच्या तुकड्यासाठी सुनेने सासऱ्याला मटनातून विष घालून मारलं तर दिर आणि सासू थोडक्यात वाचले

या प्रकरणी संशयित राजू बोडके (रा. लक्षतीर्थ वसाहत), उमेश कोळपाटे, विश्वजित फाले (बोंद्रेनगर, रिंग रोड) यांच्यासह सात जणांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी मारहाण केल्याने मीना तानाजी वरेकर (वय 48 ) जखमी झाल्या. त्यांना शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात

घर पेटविण्याचा प्रयत्न

जमावाने वरेकर याच्या घरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर, मोबाईल, कपडे, गाद्यांची नासधूस करून साहित्यावर पेट्रोल ओतून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर करवीर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरज बनसोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. संशयिताचा शोध घेण्यात येत होता.

 हे ही वाचा :  शाहू महाराज आम्हाला माफ करा! डीजेच्या ठेक्यावर तरुणींचा सिगारेट ओढत अश्लिल डान्स, कोल्हापुरातला VIDEO व्हायरल

जाहिरात

दोन्हीही गटांच्या म्होरक्यांसह साथीदार कारागृहात वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या कारणातून तीन महिन्यापूर्वी विजय ऊर्फ रिंकू देसाई व संतोष बोडके समर्थकात वाद उफाळला होता. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये संतोष बोडकेसह दोघांवर जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी विजय ऊर्फ रिंकू देसाईसह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दोन्हीही गटातील संशयितांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात