मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शाहू महाराज आम्हाला माफ करा! डीजेच्या ठेक्यावर तरुणींचा सिगारेट ओढत अश्लिल डान्स, कोल्हापुरातला VIDEO व्हायरल

शाहू महाराज आम्हाला माफ करा! डीजेच्या ठेक्यावर तरुणींचा सिगारेट ओढत अश्लिल डान्स, कोल्हापुरातला VIDEO व्हायरल

संतापजनक म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोरच हे सगळे कृत्य सुरू होते.

  • Published by:  sachin Salve
कोल्हापूर, 16 ऑगस्ट : छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूरनगरीमध्ये काय चाललंय, असा सवाल उपस्थितीत करणार व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मुलींचा अश्लील हावभाव असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील मुली सिगारेट ओढून गाण्यावर अश्लिल हावभाव करत डान्स करत आहे. कोल्हापूर म्हटल्यावर मटण, मिसळ आणि शाहूंची नगरी म्हणून ओळखी जाते. पण, शहरातल्या एका कोपऱ्यातला हा व्हिडीओ पाहून अनेक जणांनी संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये आता मुलींना नाचवण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका  तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल होत आहे. डीजे लावून तरुण बेफानपणे नाचत आहे. डीजेच्या समोरच एक स्टेज उभा करण्यात आला आहे. या स्टेजवर मुलींना उभं करण्यात आलं आहे. या मुली अश्लिल हाव भाव करत बिभत्सपणे डान्स करत आहे. यामध्ये काही तृतीयपंथींच्याही समावेश आहे. एवढंच नाहीतर या मुली डान्स करत असताना सिगारेट सुद्धा ओढत असताना दृश्यात दिसत आहे. (ट्रक थेट घरात घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नीवर झोपेतच काळाचा घाला) संतापजनक म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोरच हे सगळे कृत्य सुरू होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध शिवसेना शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार ते प्रशासनाकडे करणार असून असली कृत्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार दाखल केली जाणार आहे.
First published:

पुढील बातम्या