कोल्हापूर, 20 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे हॉटेल बिलाच्या कारणावरून हॉटेलमध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हॉटेल मालकाच्या मुलास लाथा बुक्या व दगड, विटांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत यश धनाजी हांडे (वय 30, रा. पुलाची शिरोली ता. हातकणंगले) हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रोहित बाजीराव सातपुते याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील शिरोली फाट्यावर असलेल्या हॉटेल पंचवटी येथे रोहित बाजीराव सातपुते याच्यासह अन्य सातजण आले होते. यावेळी हॉटेल बिलासंबधी त्यांच्यामध्ये वाद झाला. यातून रोहित व अन्य तरुणांनी यश याच्यावर हल्ला करुन त्यास बेदम मारहाण केली.
हे ही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात शर्यती, प्राण्यांच्या प्रदर्शनासह बाजार बंद हे कारण आले समोर
त्यांना अडविण्यासाठी आलेल्या धनाजी हंडे व अन्य कामगारांनाही मारहाण केली. याबाबतीत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्याचा प्रयत्न केल्यास जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याबाबत आठ जणांवर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कोल्हापूर जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या उत्रे गावामध्ये सचिन अरुण पाटील (वय 33) याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Kolhapur Crime) दरम्यान या घटनेने पन्हाळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटनामध्ये वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा : चंदीगड MMS लिक प्रकरणाचं मुंबई कनेक्शन? तपासात मोठी माहिती उघड
दरम्यान पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सचिन पाटील याच्याविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करून याला अटक करण्यात आली आहे. संशयित पाटील याचे कोतोली येथे हॉटेल आहे. तो व पीडित मुलगी एकाच गावचे रहिवासी आहेत. संशयिताची पीडित मुलीच्या घरी येत होती. याचा गैरफायदा घेऊन संशयित पाटील याने पीडित मुलीशी जानेवारी ते मार्च 2022 या काळात वेळोवेळी संबंध ठेवल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.