मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kolhapur Collector : कोल्हापूर जिल्ह्यात शर्यती, प्राण्यांच्या प्रदर्शनासह बाजार बंद हे कारण आले समोर

Kolhapur Collector : कोल्हापूर जिल्ह्यात शर्यती, प्राण्यांच्या प्रदर्शनासह बाजार बंद हे कारण आले समोर

महाराष्ट्र राज्यातील अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर तसेच  कोल्हापूर जील्ह्यांमध्ये सद्यस्थितीत गायीच्या पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर तसेच कोल्हापूर जील्ह्यांमध्ये सद्यस्थितीत गायीच्या पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर तसेच कोल्हापूर जील्ह्यांमध्ये सद्यस्थितीत गायीच्या पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

ज्ञानेश्वर साळुंखे, (कोल्हापूर), 10 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर तसेच  कोल्हापूर जील्ह्यांमध्ये सद्यस्थितीत गायीच्या पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेश काढले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गायींच्या रोगाचा धोका वाढला आहे. लम्पी स्कीनवर लवकर उपचार करण्यासाठी लसींचा पुरवठा केला जाणार आहे.

सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांचा कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही गायींचे नमुने तपासणी देण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चौगुलेवाडी, मौजे अतिग्रे, तालुका हातकणंगले या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले  आहेत. प्राण्यांमधील सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये अधिसूचित केलेल्या रोगामध्ये लम्पी स्कीन (LSD- Lumpy Skin Disease) या रोगाचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आदेश काढला आहे.

हे ही वाचा : Keratin Rich Foods: या 4 पदार्थांमुळे केस गळतीवर बसेल लगाम, वजन कमी करण्यासाठीही होईल फायदा

तसेच लम्पी स्कीन रोगाचा फैलाव किटका द्वारे (मच्छर, गोचीड गोमाश्या) तसेच आजारी पशूंच्या त्वचेमधून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, दुध, लाळ , वीर्य  व इतर स्त्रावा मुळे होत असल्याने पशुपालाकांनी मच्छर, गोचीड व गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

लम्पी स्कीन रोगाची लक्षणे

लम्पी स्कीन रोग बाधित पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुंना ताप येणे, पुर्ण शरीरावर 10-15 मी.मी. व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड, नाक व डोळयात व्रण निर्माण होणे, चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भूक कमी होणे, वजन कमी होणे, दुध उत्पादन कमी होणे, डोळयातील व्रणामुळे दृष्टी बाधित होणे, काही वेळा फुफ्फसदाह किंवा स्तनदाह होणे, पायावर सूज येवून लगडणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे अशी लक्षणे दिसून येतात.  या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आठवड्यात बरी होतात.

या रोगाची लक्षणे पशुमध्ये आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती / अशासकीय संस्था / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 4(1) अन्यये लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैदयकीय संस्थेस तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 32 येथील नमुद तरतुदीनुसार संबंधित खाजगी पशुवैद्यक,पशु व्यापारी, वाहतूकदार विरूध्द गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

तसेच गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे,  प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात येत आहे. उक्त नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

First published:

Tags: Cow science, District collector, Kolhapur, Pet animal