मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतातच कापला केक आणि भरवला पिकाला, पाहा काय आहे कारण Video

शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतातच कापला केक आणि भरवला पिकाला, पाहा काय आहे कारण Video

X
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं शेतातच केक कापून पिकाला भरवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं शेतातच केक कापून पिकाला भरवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

कोल्हापूर 15 मे : शेतकरी राजाला आपले शेतातले पीक केव्हाही लाख मोलाचे असते. त्यामुळे त्या पिकासाठी बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी शेतकरी करत असतो. अशाच प्रकारे स्वतःच्या पिकासाठी आनंदोत्सव साजरा करतानाचा एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वळवाच्या पावसाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करताना या शेतकऱ्याने चक्क शेतातच केक कापून कुटुंबीयांसमवेत आनंदोत्सव साजरा केला आहे.

कुठे घडली घटना?

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावात ही घटना घडली आहे. दादा खोत असे त्या माजी सैनिक असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आपल्या शेतात त्यांनी पाऊस पडल्याचा आनंद शेतामध्येच केक कापून व्यक्त केला आहे. याच आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला आहे.

टाकळीवाडी हा भाग तसा थोडाफार माळरान आहे. त्यातच पाऊस कमी पडल्यामुळे शेतात पिकांची वाईट अवस्था होऊ लागली. त्यात विहीर, बोर अशा जलस्त्रोतांचे पाणी देखील खाली गेले. यामुळे काय करावे हाच प्रश्न टाकळीवाडीतील दादा खोत आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पडला होता. मात्र आकाशात काळे ढग दाटून आले आणि वळवाच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकाला लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली. याचाच आनंद एका वेगळ्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी खोत यांनी अशा प्रकारे केक कापून सेलिब्रेशन केले.

पिकाला देखील दिला केक

दादा खोत यांना झालेला आनंद व्यक्त करताना त्यांनी विविध घोषणा दिल्या आहेत. त्यामध्ये आला रे आला.. वळवाचा पाऊस आला, शेतकरी राजा सुखी झाला.. आला रे आला.. वळवाचा पाऊस आला.. शेतकरी राजा पाऊस आला... अशी गाणी गायीली आहेत. तर जय किसान, जय विज्ञान अशा घोषणा देत त्यांनी कापलेला केक आपल्या पिकांना देखील भरवला आहे.

नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video

टाकळीवाडीतील शेतकऱ्याचे हे एक फक्त उदाहरण झाले. मात्र अशाच प्रकारचा आनंद दुष्काळी किंवा कमी पावसाच्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला होत असतो.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Local18