मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पंचाहत्तरीत लग्न केलेल्या आजी-आजोबांचा कसा सुरुय संसार? पाहा स्पेशल रिपोर्ट

पंचाहत्तरीत लग्न केलेल्या आजी-आजोबांचा कसा सुरुय संसार? पाहा स्पेशल रिपोर्ट

X
Kolhapur

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्धाश्रमात राहणाऱ्या दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं. सध्या त्यांचा संसार कसा सुरूय पाहूया...

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्धाश्रमात राहणाऱ्या दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं. सध्या त्यांचा संसार कसा सुरूय पाहूया...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

कोल्हापूर 15 मे : कोल्हापूर जिल्ह्यातील घोसरवाड येथील एक वृद्धाश्रम काही महिन्यांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. या वृद्धाश्रमातील सत्तरी पार केलेल्या दोन जणांनी प्रेमविवाह केल्यानं सर्वजण चकित झाले होते. 70 वर्षांच्या अनुसया आणि 75 वर्षांच्या बाबूराव पाटील यांनी विवाह केला होता. या लग्नाला आता दोन महिने उलटलेत. त्यानंतर त्यांचा संसार कसा सुरु आहे? याचा पाहूया स्पेशल रिपोर्ट

कसं सुरूय संसार?

'कोणत्याही व्यक्तीला उतार वयात मानसिक आधाराची सर्वाधिक गरज असते. पाटील आजोबांनाही ती होती. त्यांची ही गरज या लग्नानंतर पूर्ण होत आहे. 'हे वृद्धाश्रम म्हणजे एक घर आहे. इथं आम्ही फक्त शरिरानं नाही तर मनानं एकत्र आहोत. उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आम्ही लग्न केलंय. त्यामुळे सध्या आनंदात दिवस जात आहेत,' असं बाबूराव पाटील यांनी सांगितलं.

'घरातील एखादा सदस्य आपल्याला भेटायला येईल, अशी आशा असे. पण, आता हक्काची व्यक्ती सोबत राहत असल्यानं एक वेगळंच समाधान मिळतं. यापूर्वी काही दिवस दु:खात जायचे, पण आता मजेत आयुष्य सुरू आहे, असं पाटील यांनी सांगितलं. पाटील दाम्पत्य हे आता विवाहित असले तरी वृद्धाश्रमात राहात असल्यामुळे त्यांच्या संसाराला काही बंधनंही आहेत.

लग्नानंतरही काही बंधनं...

या वृद्धाश्रमात सर्व पुरुषांना राहण्यासाठी आणि झोपण्यासाठी एक हॉल तर महिलांसाठी दुसरा हॉल अशी व्यवस्था आहे. रोजच्या जेवणातील काही गोष्टी येथील केअर टेकर बाबासाहेब पुजारी आणि त्यांच्या पत्नी करतात. पुजारी दाम्पत्यानंच पाटील यांचे कन्यादान केले होते. त्यामुळे नवी सून जसं घरातील स्वयंपाकघर सांभाळते अगदी तसंच पाटील आजी स्वयंपाक घराची जबाबदारी सांभाळतात.

तृतीय पंथीयासोबत केलं होत लग्न, 2 वर्षानंतर सुरू आहे 'असा' संसार Video

'वृद्धाश्रमात राहून संसार करत असल्यानं काही मर्यादा येणारच होत्या. पाटील आजी-आजोबा एकमेंकांबरोबर जास्त थांबत नाहीत. मी जेवण तयार करत असताना किंवा स्वयंपाक घरातील कामं आवरत असताना हे वेळ मिळेल तेव्हा मला मदत करण्यासाठी येतात. त्याचवेळी दोघांमध्ये संवाद होतो, ' असं अनुसया आजींनी सांगितलं.

'पाटील दाम्पत्यापासून प्रेरणा घेऊन वृद्धाश्रमातील आणखी कुणाला लग्न करायचं असेल तर ते लावून देण्याची आमची तयारी आहे. पण, आयुष्यात चढ-उतार पाहिल्यानं पाटील आजी-आजोबांसारखं धाडसं करायला अद्याप कुणी तयार झालेलं नाही,' अशी माहिती पुजारी यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Local18, Marriage