जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लहान कार्यक्रम ते थेट IPL कॉमेंट्री, कशी घेतली कोल्हापूरच्या प्रसादनं भरारी? पाहा Video

लहान कार्यक्रम ते थेट IPL कॉमेंट्री, कशी घेतली कोल्हापूरच्या प्रसादनं भरारी? पाहा Video

लहान कार्यक्रम ते थेट IPL कॉमेंट्री, कशी घेतली कोल्हापूरच्या प्रसादनं भरारी? पाहा Video

यंदा पहिल्यांदाच विविध भाषांसोबतच मराठी भाषेतही सामन्याची कॉमेंट्री ऐकायला मिळत आहे. यामध्ये कोल्हापूरचा प्रसाद क्षीरसागर हा आयपीएल मॅचेससाठी कॉमेंटेटर म्हणून काम पाहत आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 17 एप्रिल : सध्या आयपीएल ची क्रेझ सगळीकडे बघायला मिळत आहे. सुरू असणाऱ्या प्रत्येक मॅचची उत्सुकता वाढवत असतो, तो मॅचची कॉमेंट्री करत असणारा कॉमेंटेटर आणि तीच कॉमेंट्री जर आपल्या मातृभाषेत असेल, तर मग मॅच पाहण्यात वेगळीच मजा येते. हीच मजा अख्ख्या महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमींना कोल्हापूरच्या प्रसाद क्षीरसागरमुळे अनुभवयाला मिळत आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी यंदा पहिल्यांदाच विविध भाषांसोबतच मराठी भाषेतही सामन्याची कॉमेंट्री ऐकायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरचा प्रसाद क्षीरसागर हा आयपीएल मॅचेससाठी निवेदक आणि समालोचक म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे कोल्हापूरचे नाव आता थेट आयपीएलच्या कॉमेंट्री रूममध्ये देखील जाऊन पोहोचले आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मूळचा कोल्हापूरच्या महाडिक वसाहत येथील असणाऱ्या प्रसाद क्षीरसागरला पहिल्यापासूनच निवेदन, वक्तृत्व या सगळ्याची आवड होती. कोल्हापुरात दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण पंत वालावलकर हायस्कूल येथून त्त्याने पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात 12 पर्यंतचे शिक्षण घेत असताना त्याने नाट्य क्षेत्रातील आपली आवड जोपासली. तर थोडेफार पैसे मिळवत शिक्षणाला हातभार लागावा यासाठी कॉलेज करत करतच तो विविध नाटकांमध्ये काम करू लागला. यावेळी प्रसादला त्याच्या अभिनय आणि वाणी कौशल्यासाठी प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळायची. नाटक करत करतच त्याने अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सूत्र संचालन देखील केले आहे. कशी मिळाली आयपीएलची संधी ? प्रसाद हा त्याच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे सगळीकडे आपले नाव कमवू लागला. त्यातच त्याने एका मोठ्या रेडिओ चॅनेलवर आरजे म्हणून देखील काम केले. रेडिओ आणि सोशल मीडियामुळे प्रसादची लोकप्रियता अजूनच वाढत गेली. दरम्यान पुण्यात प्रो कब्बडी लीगमध्ये चिअर अँकरिंग करण्याची संधी त्याला मिळाली होती. मी केलेले प्रो कब्बडी लीगमधील अँकरिंग पाहूनच सध्याच्या टाटा आयपीएलच्या मॅचेसचे मराठीतून सूत्रसंचालन आणि समालोचन करण्याची ऑफर मला मिळाली. एवढी मोठी संधी मिळाल्याने, त्याचबरोबर ज्यांना टीव्ही वर फक्त बघत आलोय त्यांच्या साठी कॉमेंट्री करायला मिळत असल्यामुळे आनंद झाल्याच्या भावना प्रसादने व्यक्त केल्या आहेत.

    IPL 2023 : अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहास

    कुठे पाहायला मिळणार मराठी मॅच ? प्रसादकडे सध्या मुंबई इंडियन्स या टीमच्या सर्व मॅच, शनिवार-रविवारच्या मॅच, प्ले-ऑफ, सेमी फायनल आणि फायनल या सगळ्या मॅचेसची कॉमेंट्री करण्याची जबाबदारी आहे. बाकीच्या मॅचेससाठी अजूनही मराठी कॉमेंटेटर असल्याचे प्रसाद सांगतो. दरम्यान या मराठी कॉमेंट्री असणाऱ्या मॅचेस प्रवाह पिक्चर आणि स्टार स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर पाहायला मिळत आहेत. खरंतर क्रिकेटवेडा असा आपला भारत देश आहे. एखाद्या मॅचवेळी कॉमेंटेटर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून शिगेला पोचवत असतो. त्यामुळे प्रसाद देखील मोठ्या आनंदाने आणि उत्सुकतेने आपल्या मातृभाषेत सर्व क्रिकेट प्रेमींना एका ठिकाणी खिळवून ठेवण्याचे काम करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात