जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Snake Bite : पावसामुळे साप आले बाहेर; दोन दिवसात तब्बल 17 शेतकऱ्यांना सर्पदंश, आरोग्य यंत्रणेची तारांबळ

Snake Bite : पावसामुळे साप आले बाहेर; दोन दिवसात तब्बल 17 शेतकऱ्यांना सर्पदंश, आरोग्य यंत्रणेची तारांबळ

Snake Bite : पावसामुळे साप आले बाहेर; दोन दिवसात तब्बल 17 शेतकऱ्यांना सर्पदंश, आरोग्य यंत्रणेची तारांबळ

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार (Kolhapur rain update) पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. (Kolhapur village people)

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 06 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार (Kolhapur rain update) पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. (Kolhapur village people) दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढे, शेत, वस्त्यांसह जनावरांच्या गोठ्यात विषारी, बिनविषारी सापांचा (snake bite) सुळसुळाट सुरू झाला आहे. दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत विविध ठिकाणी सर्पदंश झालेले 17 रुग्ण शासकीय रुग्णालयात (Kolhapur cpr hospital) दाखल झाले आहेत. त्यापैकी चौघेजण गंभीर आहेत. रुग्णांवरील उपचारात हलगर्जी होऊ नये, यासाठी वैद्यकीय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

जाहिरात

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, शाहूवाडीसह पन्हाळा, करवीर व कागल तालुक्यात सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दोन दिवसांतील पावसाने ग्रामीण भागात दैना उडाली आहे. वाड्या वस्त्यांवरील घरे, झोपड्यांत, जनावरांच्या गोठ्यात किंबहुना पाला- पाचोळ्याच्या ठिकाणी साप आश्रयाला येतात. नेमके त्या ठिकाणी धक्का लागल्याने सर्पदंश झाल्याच्या घटना घडत आहेत. शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी 95 टक्के रुग्ण शेतकरी आहेत.

हे ही वाचा :  कोल्हापूरला महापुराची पुन्हा धास्ती, पुढच्या काही तासांतच धोक्याची पातळी गाठणार?

संतोष श्रीपाल नाईक (वय 32, रा. गिरगाव फाटा, ता. करवीर), शशिकांत राजाराम पाटील (38, शेळोशी, गगनबावडा), भामूबाई माहू कारंडे (55, कसबा बावडा), सुनील रंगराव परीट (केंबळी बाचणी, ता. कागल), केशव ज्ञानू जाधव (60, वळवेंटवाडी, ता. राधानगरी), रामचंद्र श्रीपती कापसे (45, निगवे खालसा, ता. करवीर), श्यामलाल भाऊ चौगुले (हळदी, ता. करवीर), मयूर महादेव देसाई (30, सडोली खालसा, ता. करवीर), राजाराम बापू पाटील (55, कुशिरे, ता. पन्हाळा), रामू जयसिंग जाधव (26, पाडळी, ता. करवीर), आशिष तानाजी भाटणवाडे (28 परिते. ता. करवीर), विनोद शिवाजी चव्हाण (गर्जन. ता. करवीर), दिलीप गणपती तेली (60, धामोड, ता. राधानगरी) वंदना रंगराव गुरव (45, पुंगाव, ता. राधानगरी), सुशीला बाळू सावंत (55, बाजारभोगाव, ता. पन्हाळा), बेबीजान बाबासाहेब पेंढारी (60, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) अशी सर्पदंश झालेल्यांची नावे आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  Raigad Rain: पेण, पनवेल, उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार; भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती

मासे पकडायला गेला अन्…

संततधार पावसामुळे नद्यांसह ओढे, नाल्यांची पाण्याची पातळी वाढत असल्याने मासेमारी करणाऱ्या तरुणांची गर्दी दिसून येत आहे. पाडळी (ता. करवीर) येथील राम जाधव हा गावातील ओढ्यात मासेमारीसाठी गेला होता. त्यालाही सर्पदंश झाल्याने नातेवाईकांनी त्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती सुधारत आहे. प्रकृती गंभीर झालेल्या चौघांना खबरदारीसाठी अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात