कोल्हापूर, 06 जुलै : 2019 आणि 2021 या दोन वर्षांत झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यासह (Kolhapur rain) पश्चिम महाराष्ट्रात महापुराची (flood) परिस्थिती निर्माण झाली. यामुळे यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची (Kolhapur district heavy flood) नागरिकांनी धास्ती घेतली आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी (panchaganga river flood) पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पात्राबाहेर पडले. पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या (Kolhapur district crisis management department) मागणीनुसार 'एनडीआरएफ'च्या (ndrf) दोन तुकड्या मंगळवारी रात्री दाखल झाल्या. त्यापैकी एक कोल्हापुरात, तर एक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात येणार आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत दहा फुटांनी वाढ झाली. सोमवारी सकाळी पंचगंगेची पातळी 15 फुटांवर होती. मंगळवारी सकाळी ती 24.5 फुटांपर्यंत गेली. दरम्यान आज (दि.06) नंतर सकाळी 9 पर्यंत 31 फुटांवर पोहोचली आहे. दर दोन तासाला सरासरी अर्धा फुटाने पाणी वाढत चालले आहे. काल रात्री नऊ वाजता पाणी पातळी 27.9 फुटांपर्यंत होती सकाळी तीच पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून, धोका पातळी 43 फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढच्या 24 तासांत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची भीती आहे.
हे ही वाचा : कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर काय?
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिक आणि जनावरांचे स्थलांतर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. शुक्रवारपर्यंत (दि. 8) जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गतवर्षी आजअखेर झाला होता सुमारे चारपट पाऊस
गेल्यावर्षी 1 जून ते 5 जुलै या कालावधीत एकूण 408 मि.मी. इतका पाऊस झाला होता. यावर्षी याच कालावधीत 120 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. यावर्षीच्या तुलनेत गेल्यावर्षी सुमारे चारपट पाऊस झाला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात झालेला सरासरी पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 50.2 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली. गगनबावड्यात 190.08 मि.मी., राधानगरीत 87.2 मि.मी., तर शाहूवाडीत 75.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. पन्हाळ्यात 64.1 मि.मी., भुदरगडमध्ये 59.8 मि.मी., कागलमध्ये 58 मि.मी., करवीर तालुक्यात 52.5 मि.मी., चंदगडमध्ये 34.6 मि.मी., आजऱ्यात 33.4 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 24.4 मि.मी., हातकणंगलेत 20.1 मि.मी., तर शिरोळमध्ये 8.1 मि.मी. पावसाची नोंद झाली.
11 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी
जिल्ह्यातील प्रमुख 14 धरणांपैकी आंबेओहोळ (45 मि.मी.), जंगमहट्टी (35 मि.मी.), चित्री (50 मि.मी.) व चिकोत्रा (57 मि.मी.) वगळता उर्वरित सर्व 11 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. कुंभी, कासारी आणि कोदे धरण परिसरात धुवाँधार वृष्टी झाली. कुंभी परिसरात 262 मि.मी., कोदेत 237 मि.मी., तर कासारीत 236 मि.मी. पाऊस झाला. तुळशीत 175 मि.मी., पाटगाव परिसरात 145 मि.मी., कडवी आणि राधानगरीत प्रत्येकी 124 मि.मी., घटप्रभा परिसरात 108 मि.मी., वारणेत 85 मि.मी., दूधगंगेत 80 मि.मी., तर जांबरेत 72 मि.मी. पावसाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Monsoon, Rain flood, Rain in kolhapur, Weather forecast, Weather update