मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ichalkaranji : गणपती विसर्जन करताना तरूण नदीत बुडाला, इचलकरंजीचे लोकप्रतिनीधी जबाबदारी घेणार का?

Ichalkaranji : गणपती विसर्जन करताना तरूण नदीत बुडाला, इचलकरंजीचे लोकप्रतिनीधी जबाबदारी घेणार का?

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता काही नागरिक पंचगंगा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी दोन युवक वाहून गेले यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा वाहून गेला.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता काही नागरिक पंचगंगा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी दोन युवक वाहून गेले यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा वाहून गेला.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता काही नागरिक पंचगंगा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी दोन युवक वाहून गेले यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा वाहून गेला.

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 06 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात गणपती विर्सजन हे नदीतच होणार अशी आडमुठी भूमिका घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. दरम्यान गणपती विसर्जन हे खणीत किंवा कुंडामध्ये करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता काही नागरिक पंचगंगा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी दोन युवक वाहून गेले यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा वाहून गेला. यामुळे नदीत गणपती विसर्जन करणारचं या लोकप्रतीनिधींच्या युवकांना खो घालणाऱ्या भूमिकेवर नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

घरगुती गणपतीचे विसर्जन करत असताना स्वप्नील मारुती पाटील (वय 22, रा. गल्ली नंबर 8, दत्तनगर कबनूर) हा रुई येथील युवक पंचगंगा नदीत वाहून गेला. तर नागरिकांनी विशाल पाटील या युवकाला वाचविण्यात यश आले. काल (दि.05) दुपारी 4.30 सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे स्वप्नीलला पोहायला येत होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सोमवारी घरगुती गणपतीचे विसर्जन असल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई येथे पंचगंगा नदीवर मोठी गर्दी होती. इंगळी गावाकडील बाजूस स्वप्नील गणपती विसर्जन करीत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.

हे ही वाचा : मुंबईतून निघतानाही अमित शाहंनी शिवसेनेला डिवचलं, 'मराठी'तून सांगितली पुढची रणनिती

लोकप्रतिनिधी जबाबदारी घेणार का?

मागच्या काही दिवसांपासून इचलकंरजीचे आमदार प्रकाश आवाडेंनी पंचगंगा नदीतच विसर्जन करणार ही भूमिका घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत परवानगीही घेतल्याचे पत्र त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु याला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विरोध करत थेट नदीत विसर्जन न करण्याचे आदेश काढले. आमदार आवाडेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेला विरोध करत गणपती विसर्जन नदीतच होणार अशी भूमिका घेतली. परंतु काल एक युवक नदीत वाहून गेला. दरम्यान याला जबाबदार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केला.

हे ही वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, मागून ट्रकने दिली धडक

'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात आणि ऊन, पावसाच्या खेळात सोमवारी सकाळपासून घरगुती गणरायाच्या विसर्जनास प्रारंभ झाला. पंचगंगा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेकांनी कृत्रिम कुंडात विसर्जन करुन मूर्ती दान केल्या. तर अनेकांनी पारंपारिक पध्दतीने पंचगंगा नदीतच विसर्जन करुन बाप्पांना निरोप दिला.

First published:

Tags: Death, Ganesh chaturthi, Ganga river, Kolhapur

पुढील बातम्या