मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईतून निघतानाही अमित शाहंनी शिवसेनेला डिवचलं, 'मराठी'तून सांगितली पुढची रणनिती

मुंबईतून निघतानाही अमित शाहंनी शिवसेनेला डिवचलं, 'मराठी'तून सांगितली पुढची रणनिती

Amit Shah Mumbai BMC

Amit Shah Mumbai BMC

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा (Amit Shah in Mumbai) संपवून पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यात अमित शाह यांनी भाजपला मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मिशन 150 चं टार्गेट दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा (Amit Shah in Mumbai) संपवून पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यात अमित शाह यांनी भाजपला मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मिशन 150 चं टार्गेट दिलं आहे. 'शिवसेनेनं (shivsea) आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे' असं म्हणत अमित शहा (amit shah) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान मुंबईहून निघतानाही अमित शाह यांनी मराठीतून ट्वीट करत मुंबई महापालिकेत एनडीएचंच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. 'मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. मोदीजींच्या नेतृत्वात एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत, जनता NDA सोबत आहे. मला विश्वास आहे की आगामी BMC निवडणुकीत NDA प्रचंड बहुमताने विजयी होईल,' असं ट्वीट अमित शाह यांनी केलं.

'2014 च्या निवडणुकीच्या वेळी फक्त दोन जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली होती. सेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. आता त्यांना जागा दाखवा. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे,' असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी मुंबईत भाजप आमदार, खासदार, नगरसेवक यांची भेट घेतली. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकांसाठी अमित शाह यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकाही घेतल्या.

First published:

Tags: Amit Shah, BJP, BMC