पुणे, 5 सप्टेंबर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातांच्या सत्रामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. त्यात आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या कारला अपघात झाला आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर राणे कुटुंबीयांच्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या मोटारीत नितेश राणे त्यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. नितेश राणे यांची पत्नी नातेवाईकांसह पुण्याच्या दिशेने येत होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोल नाका येथे टोल भरण्यासाठी मोटर रांगेत होती, तेव्हा पाठीमागे असलेल्या ट्रकने राणे कुटुंबीयांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या शिरगावं पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.