दुर्ग, 27 सप्टेंबर : छत्तीसगड राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने रात्री गळा चिरून पतीची हत्या केली. त्याला मारूनही तिचा राग कमी झाला नाही. त्यानंतर तिने पतीचा गुप्तांगही कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच एवढेच नाही तर महिला रात्रभर मृतदेहाजवळ झोपली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना छत्तीसगड राज्यातील दुर्गच्या अमलेश्वर परिसरातील आहे. रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपल्यानंतर सकाळी बाहेर येऊन तिने आपल्या पतीला कोणीतरी मारले, असे म्हणत आरडाओरड केली. मात्र, पोलिसांनी आरोपी पत्नीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. पाटणचे एसडीओपी देवांश राठोड यांनी सांगितले की, ही घटना अमलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी गावातील आहे. अमलेश्वर पोलिसांना सोमवारी सकाळी 40 वर्षीय अनंत सोनवणी हा घरात मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. यानंतर कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली. यादरम्यान मृताची पत्नी संगीता (वय 34) ही पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र, अनंतच्या पत्नीचा खून झाल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली होती.
पोलिसांनी संगीताची कसून चौकशी केली असता ती घाबरली आणि अखेर तिने आपला गुन्हा कबूल केला. मात्र, संगिताने हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिला सतत मारहाण आणि छळ करत असे. नेहमी कुरूप बोलून टोमणे मारायची आणि घर सोडायला सांगायचा. घटनेच्या रात्री अनंतने पत्नी संगीता हिला मारहाण केली होती. मग तो झोपायला गेला पण बायकोने बदला घेण्याचे ठरवले होते. संतापलेल्या पत्नीने रात्री घरात ठेवलेल्या दांडक्याने वार करून अनंतला जीवे मारले. त्याला मारूनही तिचा राग कमी झाला नाही. त्यानंतर तिने पतीचा प्रायव्हेट पार्टही कापला. यानंतर रक्ताने माखलेली साडी पलंगाखाली लपवून ठेवली होती. संगीता ही अनंत सोनवणी याची दुसरी पत्नी होती. त्याच्या पहिल्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. संगीताही आधीच विवाहित होती. अनंतला पहिल्या पत्नीपासून 12 वर्षांचा मुलगा आहे. हेही वाचा - जीवापाड प्रेमात झाली मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत मृतदेहाची सेवा; दररोज नमस्कार करून ड्यूटीवर जात होती बँक मॅनेजर पत्नी तर संगीतापासून एक चार महिन्यांची मुलगी आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेवर कलम 302,201 अन्वये कारवाई केली आहे. अमलेश्वर टीआय राजेंद्र यादव यांनी सांगितले की, मृताच्या गुप्तांगासह अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.