कोल्हापूर, 20 मे : कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, या जिल्ह्यात (kolhapur, sangli heavy rain) पावसाने जोरदार हजेरी लावली. (heavy rain fall) हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे वारे वाहत असल्याने कोल्हापूर सांगली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून alert जारी करण्यात आला होता. दरम्यान काल (दि.19) संध्याकाळपासून कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. (weather alert)
दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त कोल्हापूर शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. शाहू मिल येथे 20 ते 22 मे 2022 दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील (heavy rain kolhapur) सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी माहिती दिली.
हे ही वाचा : Weather Updates: ‘या’ राज्यात पूरस्थिती गंभीर, Yellow अलर्ट जारी; 7 लाखांहून अधिक लोक प्रभावित
गोवा राज्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात सर्वाधिक 68 मिमी पावसाची नोंद झाली, या पाठोपाठ हातकणंगले 48, गडहिंग्लज 35, राधानगरी 19, आजरा 68, शिरोळ 48, शाहूवाडी 9,पन्हाळा 40, गगनबावडा 47, चंदगड 55, करवीर तालुक्यासह अन्य तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात 19, सांगोला 23, तर माढा तालुक्यात 2.4 मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-8, लांजा-13, चिपळूण-18, देवरुख-8 राजापूर-3, मंडणगड-0, पारनेर-21, राहुरी-1.6 अशी पावसाची नोंद झाली.
गेल्या 24 तासातील पाउस ...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 20, 2022
मोहोळ-19
सांगोला-23
माढा-2.4
हातकणंगले 48,गडहिंग्लज 35,राधानगरी 19
आजरा 68,शिरोळ 48,शाहूवाडी=9,पन्हाळा 40
गगनबावडा 47, चंदगड 55
खेड-8,लांजा-13,चिपळूण-18,देवरुख-8
राजापूर-3,मंडणगड-0
पारनेर-21,राहुरी-1.6
Mulde-8
दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे.
राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.