मुंबई, 9 फेब्रुवारी- मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून प्रसाद ओक चं नाव घेतलं जातं. प्रसादने अभिनयासोबतच दिग्दर्शनातसुद्धा कमाल केली आहे. गेल्यावर्षी अभिनेता ‘धर्मवीर’ या चित्रपटात झळकला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असणारा हा सिनेमा तुफान लोकप्रिय ठरला होता. यामध्ये प्रसाद ओकने आनंद दिघे यांची मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेता क्षितिश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने खास पोस्ट लिहत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी अभिनेता प्रसाद ओक आपल्या चित्रपटांमुळे तर चर्चेत असतोच शिवाय तो सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असतो. अभिनेता सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत महत्वाच्या अपडेट्स शेअर करत असतो. प्रसाद आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबतचे सुंदर फोटो आणि मजेशीर व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. दरम्यान आज अभिनेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही फोटो शेअर केले आहेत. **(हे वाचा:** Valentine’s Day 2023: ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या तोंडावर अमृता-हिमांशूमध्ये बिनसलं? पतीने अभिनेत्रीला केलं अनफॉलो ) प्रसाद ओक पोस्ट- प्रसाद ओकने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुख्यमंत्र्यांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच शुभेच्छा देत लिहलंय, ‘मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ जी शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!!!ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!!!’’. प्रसादच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
प्रसाद ओक नेहमीच स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखला जातो. ‘धर्मवीर’ हा प्रसादच्या आयुष्यातील महत्वाचा सिनेमा ठरला. या चित्रपटाने प्रसादच्या करिअरला मोठी झेप दिली आहे. हा चित्रपट स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित होता. यामध्ये प्रसादने आनंद दिघेंची मुख्य भूमिका साकारत लक्ष वेधलं होतं. तर अभिनेता क्षितीश दातेने यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन-लेखन अभिनेते प्रवीण तरडेंनी केलं होतं. सिनेमा अफाट चर्चेत आला होता.
प्रसाद ओक सध्या टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहे. अभिनेत्याने मराठी मालिका आणि चित्रपट दोन्हींमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. त्याचा एक खास चाहतावर्ग आहे. चाहते नेहमीच त्याच्या प्रत्येक नव्या प्रयत्नाला भरभरुन प्रेम देत असतात.

)







