कोल्हापूर, 13 मार्च : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विहिरीत पडून एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आजरा शहरातील भारतनगर परिसरातून ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. कार्तिकी सचिन सुतार वय 14 वर्ष असं या मुलीचं नाव आहे. कार्तिकी आपल्या आजीसोबत शेतामध्ये गेली होती, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. म्हशीचा धक्का लागला अन्… घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कार्तिकी आपल्या आजीसोबत शेतात गेली होती. यावेळी ती विहीरीतून पाणी काढत असतानाच शेजारी बांधलेल्या म्हशीचा तिला धक्का लागला. म्हशीचा धक्का लागल्यानं ती विहीरीमध्ये पडली. घटना लक्षात आल्यानंतर तिच्या आजीने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत वेळ झाला होता. विहिरीत पडून कार्तिकीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रॉन्ग नंबरमुळे बनलेल्या प्रियकरासोबत पळाली तरुणी; आधार कार्ड घ्यायला घरी परत येताच मोठं कांडपरिसरातून हळहळ
विहिरीत पडून 14 वर्षीय कार्तिकीचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. नात विहिरीत पडल्याचं लक्षात आल्यानंतर आजीने आरडाओरड केली. मात्र ग्रामस्थ येईपर्यंत उशिर झाला. अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.