जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / रॉन्ग नंबरमुळे बनलेल्या प्रियकरासोबत पळाली तरुणी; आधार कार्ड घ्यायला घरी परत येताच मोठं कांड

रॉन्ग नंबरमुळे बनलेल्या प्रियकरासोबत पळाली तरुणी; आधार कार्ड घ्यायला घरी परत येताच मोठं कांड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

घरातून पळून गेलेल्या मुलीने प्रियकरासोबत लग्न केलं आणि आधार कार्ड मागण्यासाठी आईकडे घरी गेली. या नात्याला आईने विरोध केला असता या मुलीने प्रियकरासह मिळून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

पाटणा 13 मार्च : प्रेम प्रकरणातून घडलेलं एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. बिहारमधील अराहमध्ये एका आईला आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणात ढवळाढवळ करणं चांगलंच महागात पडलं. घरातून पळून गेलेल्या मुलीने प्रियकरासोबत लग्न केलं आणि आधार कार्ड मागण्यासाठी आईकडे घरी गेली. या नात्याला आईने विरोध केला असता या मुलीने प्रियकरासह मिळून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रेमी युगुल आणि आई यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा पाहून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान आई आणि मुलगी दोघीही एकमेकांना शिवीगाळ करताना तसंच मारताना दिसल्या. त्याचवेळी नाट्यानंतर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, नंतर स्थानिक लोकांनी प्रेमी युगुल आणि आईला कसं तरी पटवून प्रकरण शांत केलं. सूनेला घेऊन सासरा फरार, 1 महिना झाला तरी पत्ता नाही; मुलगा म्हणतो… खरं तर, आरा शहरातील आनंद नगरमध्ये राहणारी रजनी कुमारी (18 वर्षे) हिचं पटना जिल्ह्यातील शालीमपूर अहरा गावात राहणारा राजेंद्र (25 वर्षे) याच्यासोबत राँग नंबरवर बोलत असताना प्रेम झालं. प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं आणि दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. यानंतर दोघंही कुटुंबापासून वेगळे झाले आणि पाटण्यात राहू लागले. दरम्यान, मुलीला आधार कार्डाची गरज असल्याने तिने आपल्या आईकडे आधार कार्ड मागितले. यासाठी ती आराह सदर रुग्णालयात आईकडे पोहोचली होती. त्यानंतर आई आणि मुलीमध्ये वाद सुरू झाला आणि दोघींमध्ये हाणामारी झाली.

News18लोकमत
News18लोकमत

प्रियकर राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, त्यांचे प्रेमप्रकरण जवळपास वर्षभर सुरू आहे. दोघांनीही लग्न केलं आहे. मुलीच्या आईलाही याची माहिती आहे आणि तिनेच तिला माझ्या घरी सोडलं होतं. आज जेव्हा प्रेयसी तिच्या आईकडून आधार कार्ड घेण्यासाठी गेली तेव्हा तिच्या आईने आरडाओरडा करत मारामारी सुरू केली. मुलीच्या म्हणण्यानुसार, ती स्वतःच्या इच्छेने लग्न करून तिच्या प्रियकरासोबत राहत आहे आणि तिला आता तिच्या माहेरच्या घरी जायचं नाही. तसंच, मुलीच्या आईने सांगितलं की, ‘मुलीने घराचे नाक कापले आहे, आता अशा मुलीला आम्ही ठेवू शकत नाही. तिला वाटेल ते तिने करावं. मी आता तिच्याशी संबंध ठेवणार नाही’. मात्र, प्रेमी युगुल आणि आई यांच्यातील भांडणानंतर लोक विविध प्रकारच्या चर्चा करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात