जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur : अग्निवीर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मिळणार मोफत जेवण, पाहा Video

Kolhapur : अग्निवीर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मिळणार मोफत जेवण, पाहा Video

Kolhapur : अग्निवीर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मिळणार मोफत जेवण, पाहा Video

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणांना मोफत जेवण दिले जात आहे.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 11 डिसेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय सैन्यदलातील अग्निवीर भरती प्रक्रिया ही शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू आहे. रोज वेगवेगळ्या ठिकाणचे तरुण येथे भरतीसाठी सहभागी होत आहेत. या सर्व उमेदवारांची थांबण्याची व्यवस्था ही राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात केली गेली आहे. त्याच बरोबर जिल्हा प्रशासनातर्फे उमेदवारांसाठी प्रसाधनाची सोय, पिण्याचे पाणी दिले आहे. यात जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी  संस्थेकडून केली गेली आहे. व्हाईट आर्मी म्हणजेच जीवन मुक्ती सेवा संस्था ही गेल्या 15 वर्षांपासून कोल्हापुरातील भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणांना मोफत अन्नछत्रची सोय करत आहे. भरती प्रक्रियेवेळी इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स यांच्याकडूनही व्हाईट आर्मीस मोफत अन्नछत्र देण्यासाठी बोलवण्यात येते. गेली 21 वर्षे व्हाईट आर्मी ही संस्था आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत बचाव, मदत आणि पुनर्वसनाचे काम करत आहे. त्याचबरोबर अन्नछत्र देखील त्या ठिकाणी चालवले जाते.

    Kolhapur : व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुण करतायत रुग्णांची मदत, अनेकांचे वाचवले प्राण, Video

    मोफत अन्नछत्र सेवा आम्ही पुरवतो गेल्या 15 वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या आर्मी रिक्रुटमेंट ऑफिससह आम्ही जोडलो गेलो आहोत. तेव्हापासू दरवर्षी यांच्यासोबत भरती प्रकियेवेळी महाराष्ट्र राज्यात सगळीकडे जाऊन मोफत अन्नछत्र सेवा आम्ही पुरवतो. यातून आजअखेर जवळपास साडे पाच लाख मुलांनी या मोफत अन्नछत्रचा लाभ घेतलेला आहे. सध्या कोल्हापुरात महाराष्ट्रातील सहा जिल्हे व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी ही अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी येणाऱ्या तरुणांना भरती प्रक्रियेच्या स्थळीच विविध चाचण्यांनंतर मोफत अन्नाची सोय आमच्या संस्थेतर्फे केलेली आहे. त्यासाठी येथे असणाऱ्या स्वयं सेवकांकडून योग्य त्या प्रकारे नियोजन केलेले असते. रोज जेवण बनवण्यापासून ते त्या तरुणांना पुरवण्यापर्यंतची सर्व कामे स्वयंसेवकच करत असतात. पण त्यातही योग्य ती शिस्त असते, असे व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत एकूण 37 हजार मुलांना दिले जेवण आतापर्यंत एकूण 37 हजार मुलांना आम्ही जेवण दिलेले आहे. यामध्ये कोणत्याही मुलाला जेवणाचा त्रास होऊ नये, यासाठी सकस आहाराचा समावेश केला जातो. यामध्ये भात, तूरडाळीची आमटी आणि लोणचे असा पौष्टिक आहार दिला जातो. रोज पहाटेपासून हे जेवण बनवले जाते. जेवण पूर्ण बनवून झाल्यानंतर या जेवणाची आमच्या एका स्वयंसेवकामार्फत टेस्ट केली जाते आणि त्यानंतरच या मुलांना दिले जाते, असे रोकडे यांनी सांगितले आहे.

    Sangli : बेघरांसाठी मायेची ‘सावली’, शेकडो जणांना मिळाला आधार, पाहा Video

    रात्री जेव्हा भरतीसाठी मुलं एकत्र येतात, त्या ठिकाणी रोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत 1 हजार 500 ते 2 हजार मुलांना जेवण दिले जाते. तर भरती प्रक्रियेच्या ठिकाणी रनिंग, मेडिकल चेकअप किंवा डॉक्युमेंट व्हेरिफकेशन साठी जी मुलं थांबतात त्यांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे जेवण दिले जाते. भरतीवेळी काही जणांची निराशा होते पण या ठिकाणी काही न खाता आलेलो आहे. आमच्या पोटात अन्न नाही आहे. पण जाताना पोटभर जेवण मिळत आहे. याचं समाधान येणारी मुले व्यक्त करत असतात, असे देखील रोकडे यांनी नमूद केले.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे चालवले जाते मोफत अन्नछत्र कोल्हापुरात सायबर कॉलेजच्या पाठीमागे राजाराम महाविद्यालय क्रीडांगणात भरती प्रक्रियेसाठी सुरुवातील एकत्र येणाऱ्या मुलांना रात्री हे जेवण दिले जाते. तर शिवाजी विद्यापीठातील भरती प्रक्रियेच्या ठिकाणीच क्रीडांगणाशेजारीच दिवसभर हे अन्नछत्र सुरू असते. अधिक माहितीसाठी  +91 98500 79801 या नंबरवर संपर्क करा. संस्थेमार्फत दिले जाते मोफत मदतकार्य देखील गेल्या 21 वर्षापासून या संस्थेमार्फत संपूर्ण भारतात व भारताबाहेर आपत्तीमध्ये मोफत मदतकार्य केले जाते गुजरात भूकंप, कोकण रेल्वे अपघात, केरळ सुनामी मांढरदेवी एक्सीडेंट उत्तराखंड ढगफुटी, सांगली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागात, माळीन दुर्घटना, काश्मीर पूर नेपाळचा भूकंप केरळचा महापूर, फनी वादळ, कोविड काळात हॉस्पिटल व अन्नछत्र अशा आपत्ती जन्य परिस्थितीत 24 तास कार्यरत असणारी ही संस्था आहे. या संस्थेमध्ये हजारो तरुण तरुणी डॉक्टर वकील इंजिनिअर शालेय विद्यार्थी मोफत सेवा देतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात