मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dhairyasheel Mane Mother : खासदार धैर्यशील मानेंच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा, अटकेसाठी फिर्यादीचा ठिय्या तरीही कारवाई नाही

Dhairyasheel Mane Mother : खासदार धैर्यशील मानेंच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा, अटकेसाठी फिर्यादीचा ठिय्या तरीही कारवाई नाही

खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने (Dhairyasheel Mane Mother) फसवणूक प्रकरणात पुन्हा संकटात सापडल्या आहेत.

खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने (Dhairyasheel Mane Mother) फसवणूक प्रकरणात पुन्हा संकटात सापडल्या आहेत.

खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने (Dhairyasheel Mane Mother) फसवणूक प्रकरणात पुन्हा संकटात सापडल्या आहेत.

  • Published by:  Sandeep Shirguppe

सोलापूर, 14 सप्टेंबर : हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांनी एकाची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हे प्रकरण 2019 सालचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मागच्या तीन वर्षांपूर्वीच्या फसवणूक प्रकरणात माजी खासदार निवेदिता माने (Dhairyasheel Mane Mother) पुन्हा संकटात सापडल्या आहेत. त्यांनी 1 कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारदाराने माजी खासदार यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. फिर्यादीने टेभुर्णी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत उपोषण केले. त्यामुळे निवेदिता माने यांच्यावर कारवाई होणार का याबाबत चर्चा सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

फिर्यादी बबन केचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार निवेदिता माने व इतरांनी संगनमत करुन 2009 मध्ये उजनी जलाशयातील गाळ व रेती उचलण्याच्या ठेक्याची स्थगिती उठवली होती. त्यावेळी तो ठेका पुढील 15 वर्ष राहावा म्हणून 1 कोटी 55 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे केचे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान याबाबत केचे यांनी माजी खासदार माने यांच्याकडे अनेकदा पैसे मागितले.

त्यासाठी ते कोल्हापूरलाही गेले. मात्र त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले गेले नाही. आपल्या मागणीकडे निवेदिता माने यांनी वेळोवेळी दुर्लक्षच केले, असा दावा बबन केचे यांनी केला आहे. माने यांनी फसवणुक केलेली रक्कम व्याजासकट द्यावी, यासाठी मी माझा लढा सुरुच ठेवणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : 'वेदांता' गुजरातला गेल्यानं राजकारण तापलं, आशिष शेलारांनी मांडली शिवसेनेच्या विरोधाची कुंडली

मागच्या महिन्यात शिंदे गटात सामील झालेल्या धैर्यशील माने यांच्या त्या मातोश्री आहेत. केचे यांच्या माहितीनुसार निवेदिता माने यांच्यावर 1 कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीची तक्रार चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये करण्यात आली होती. त्या आधारे पोलिसांनी निवेदिता माने यांच्यासह इतर पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे आला होता.

मागच्या चार वर्षांपू निवेदिता माने व इतर आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तीन वर्षे झाली. मात्र पोलिसांनी अजून त्यांना अटक केलेली नाही. पोलिसांच्या या उदासीनतेवर फिर्यादी बबन केचे यांनी बोट ठेवले. याचवेळी त्यांनी पोलिसांच्या सुस्त कारभाराच्या निषेधार्थ टेभुर्णी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करुन उपोषण केले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस खात्याकडून पुन्हा कार्यवाहीला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा : खासदार धैर्यशील मानेंनी फेसबुक कमेंट बॉक्स सुरू करताच शिवसैनिक पडले तुटून

पोलीस कारवाई का करत नाहीत

मी तीन वर्षांपूर्वी तक्रार दाखल करूनही पोलीस पुढील कारवाईला दिरंगाई का करताहेत? अटकेची कारवाई आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यास चालढकल का केली जात आहे? तक्रार धूळखात का पडलेय? असे सवाल फिर्यादी बबन केचे यांनी उपस्थित केले. तसेच उपोषण करून आपल्या मागणीकडे पोलीस खात्याचे लक्ष वेधले. आपल्या तक्रारीवर कार्यवाहीची मागणी करीत ते पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून बसले.

First published:

Tags: Kolhapur, Shiv Sena (Political Party), Solapur (City/Town/Village), Solapur news

पुढील बातम्या