कोल्हापूर, 04 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि 12 खासदारांनी शिवसेनेशी बंडखोरी करून महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार केले. दरम्यान 12 खासदारांपैकि कोल्हापूर जिल्ह्यातील 2 खासदारांनीही शिंदे गटासोबत जाणे पसंद केले. यामध्ये धैर्यशील माने यांच्या समावेश आहे दरम्यान त्यांनी बंडखोरी केल्यापासून त्यांचा फेसबुक कमेंट बॉक्स बंद करून ठेवला होता. त्यांनी तो सुरू केल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना चांगलच ट्रोल केलं आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांच्या दौऱ्याविषयीची फेसबुकवर पोस्ट केली आहे. आज देशाचे हवाई उड्डाण व नागरी विमान मंत्री ना.ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने यांनी आज कोल्हापूर विमानतळ आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दररोज सकाळी व संध्याकाळी असे दोन स्लॉटमध्ये सुरू करण्यास सांगितले. तसेच आठवड्यातून तीनवेळा असणारी कोल्हापुर -अहमदाबाद विमानसेवा दररोज सुरू करावी या मागणीसह विमानतळ टर्मिनल बिल्डिंगचे काम लवकरात लवकर सुरू करून संपवावे असेही म्हणाले. या केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांनी मात्र जोरदार टीका केली आहे.
हे ही वाचा : अजितदादा मुख्यमंत्र्यांना म्हणाले, शो मॅन राज कपूर, श्रीकांत शिंदेंनी दिली पहाटेच्या फ्लॉप शोची आठवण
यामध्ये लक्ष्मण पुजारी या शिवसैनिकाने पट्टण कोडोलीमधील पेयजल योजना कधी पूर्ण होणार आहे? नाही म्हटलं जिल्हा परिषद सदस्य पट्टण कोडोली मधून निवडून आला त्यानंतर खासदार झाला. आता माजी खासदार होणार आहे… तरी आजून पेयजल योजना पूर्ण झाली नाही. एक पेयजल योजना पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदचा सदस्य काळ संपला. खासदारकी पण संपत आली पण पेयजल योजना काय पूर्ण होत नाही आहे. माजी खासदार झाल्यावर तरी होईल काय.अशी पट्टण कोडोली करांच्या प्रतिक्रिया असल्याचे शिवसैनिक म्हणाले.
खासदार माने यांच्या ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा
खासदार धैर्यशील माने यांनी मातोश्रीवरील बैठक तसेच कोल्हापुरात झालेल्या शिवसेना मेळाव्याला दांडी मारल्याने त्यांच्याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांनी तब्येतीचे कारण देत दांडी मारली होती. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून आपण खूप प्रयत्न केले, पण परस्थिती हाताबाहेर गेल्याने निर्णय घ्यायची वेळ आली, असे सांगणारी त्यांनी ऑडिओ क्लीप मतदारसंघात व्यवस्थित व्हायरल होईल, याची काळजी घेतली होती. 2 आमदारांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यामध्ये धैर्यशील माने यांचाही समावेश होता.
हे ही वाचा : काँग्रेसला पडणार मोठे खिंडार, अशोक चव्हाणांसोबत 15 आमदार सोडणार ‘हात’?
माने यांची बंडखोरी कशासाठी?
जो मातोश्रीवर सहज प्रवेश मिळत नाही, तो धैर्यशील माने यांना सहज मिळाला होता. इतकचं नाही, तर खासदार झाल्यानंतर त्यांना प्रवक्तेपदी दिले. मुळचे शिवसैनिक नसतानाही पक्षाकडून उचित सन्मान राखला गेला. असे असूनही शिंदे गटात धैर्यशील माने यांनी जाण्याचा निर्णय का घेतला? याचीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे. हातून काहीच ठोस काम झाले नसल्याने मतदारसंघातील कोरे-आवाडे-महाडिक-हाळवणवकर गटाचा फायदा आपल्याला 2024 मध्ये होईल, या अंदाजाने शिंदे गटात गेल्याची चर्चा रंगली आहे.