जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur : स्ट्रीट फूडला गावरान तडका.. स्पेशल तवा टोस्टची कोल्हापुरात चर्चा! Video

Kolhapur : स्ट्रीट फूडला गावरान तडका.. स्पेशल तवा टोस्टची कोल्हापुरात चर्चा! Video

Kolhapur : स्ट्रीट फूडला गावरान तडका.. स्पेशल तवा टोस्टची कोल्हापुरात चर्चा! Video

कोल्हापुरच्या खाऊ गल्लीत दोन मित्रांनी एक फ्युजन फूड आणले आहे. या नव्या प्रकाराची सध्या शहरात जोरदार चर्चा आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 16 नोव्हेंबर : एखाद्या शहरी डिशमध्ये गावरान तडका दिला, तर तो एक वेगळा प्रकार वाटतो. आजकाल अशा स्ट्रीट फूडला खवय्यांकडून चांगलीच पसंती दिली जात आहे. कोल्हापूर च्या खाऊ गल्लीत देखील दोन मित्रांनी असे एक फ्युजन फूड आणले आहे. हे फ्युजन फूड म्हणजे गावरान तवा टोस्ट. त्यामुळे स्ट्रीट फूडच्या पंक्तीत अजून एक नवी डिश कोल्हापूरकरांसाठी जोडली गेली आहे. काय आहे खास? अमर गडीवड्डर आणि योगेश कागले या दोन मित्रांनी गावरान तवा टोस्ट या डिशची कोल्हापुरात सुरुवात केली आहे. सँडविच टोस्ट या स्ट्रीट फूडला एका वेगळ्या रुपात आणण्याची संकल्पना त्यांना सुचली. सँडविचमध्ये सगळीकडं हिरवी चटणी वापरली जाते. अमर आणि योगेश यांनी त्यांच्या डिशमध्ये स्वत: तयार केलेली स्पेशल चटणी वापरली. या चटणीमध्ये त्यांनी अस्सल गावरान चवीचा मसाला वापला. त्यामुळे फ्युजन डिशच्या चवीत स्पेशल ग्रामीण टच मिळतो. त्याचबरोबर सहसा सँडविच टोस्ट हा टोस्टरमध्ये किंवा सँडविच मेकरमध्ये बनवला जातो, पण इथं तो तव्यावर बनवतात. स्ट्रीट फूड तरुणांचा आवडता प्रकार आहे. त्यातही सँडविच टोस्ट हे त्यांचे विशेष आवडते आहे. नेहमीपेक्षा वेगळं देण्याची आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही आमच्या गावरान टोस्ट या डिशमध्ये अस्सल गावरान मसाले वापरुन स्पेशल चटणी बनवली.  मिक्स व्हेजिटेबल, मिक्स सलाड बेस, असे वेगवेगळे फ्युजन्स ग्राहकांसाठी तयार केले आहेत. सँडविचचे हे सर्व प्रकार आम्ही तव्यात करतो. ते पूर्ण ग्रील न करता फक्त भाजून देतो. त्यामुळे त्याला एक वेगळी चव येते, अशी माहिती योगेश कागले यांनी दिली आहे. मटक्यात शिजणारं बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरात! पाहा Video कोणकोणते टोस्ट मिळतात? व्हेज तवा टोस्ट, सालसा तवा टोस्ट, मस्टर्ड तवा टोस्ट, शेजवान तवा टोस्ट, बीबीक्यू तवा टोस्ट, चीज चिली तवा टोस्ट, इटालियन तवा टोस्ट, तंदूर तवा टोस्ट असे सर्व तवा टोस्टचे प्रकार आपल्याला गावरान पद्धतीने खायला मिळतात. किती आहे किंमत? सर्व वेगवेगळ्या प्रकारचे टोस्ट 50 ते 60 रुपयांमध्ये तर टोस्टमध्ये एक्स्ट्रा चीज घेतले तर त्याची किंमत 65 ते 75 रुपये आहे. दोन मित्रांच्या या गावरान तवा टोस्टची कोल्हापुरात चांगलीच चर्चा सुरु आहे. गावरान चवीचं काहीतर नवीन आणि चटपटीत खायला मिळत आहे. त्यामुळे इथे  पुन्हा यावं असं वाटत असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरकरांनी दिली आहे. कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय? पाहा Video

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे खाणार? गावरान तवा टोस्ट, खाऊ गल्ली, खासबाग मैदानाजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर - ४१६ ०१२ वेळ : संध्याकाळी  5 ते 10 संपर्कासाठी क्रमांक :  अमर गडीवड्डर, +917776934545

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात