जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मटक्यात शिजणारं बिहारचं फेमस 'चंपारण मटण' आता नागपुरात! पाहा Video

मटक्यात शिजणारं बिहारचं फेमस 'चंपारण मटण' आता नागपुरात! पाहा Video

मटक्यात शिजणारं बिहारचं फेमस 'चंपारण मटण' आता नागपुरात! पाहा Video

बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 29 डिसेंबर : बिहारच्या मांसाहार डिश बद्दल बोलायचं झालं तर त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे ‘चंपारण मटण’. खास बिहारी मसाला आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे मटण सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, नागपुरी सावजी म्हणून देशभर लौकिक प्राप्त असलेल्या नागपूर च्या धर्तीवर या बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे.   चंपारण मटणाची सुरुवात प्रथम इंडो- नेपाळ बॉर्डरवर वसलेल्या घोराशन येथील गावांमध्ये झाली. त्यानंतर या डिशला खऱ्या अर्थानं लौकिक प्राप्त झाला तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यात. या जिल्ह्याच्या नावावरूनच या डिशचेही नाव पडले चंपारण. हा मांसाहारी पदार्थ प्रसिद्ध आहे तो त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मातीचे भांडे आणि पद्धतीमुळे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या भांड्याला भोजपुरी भाषेत अहूना असे बोलल्या जातं. म्हणून याला आहूना मटण देखील म्हटले जाते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    असे बनते चंपारण मटण  मातीच्या भांड्यावर झाकण ठेवून त्यात खास बिहारी मसाला, लसूण, कांदा, मिरची, विशेष असे भाजलेले सरसोचे तेल टाकून झाकण कणीकने घट्ट बंद करून कोळसा अथवा लाकडाच्या कोळशावर शिजवले जाते. त्यानंतर ठरावीक कालावधीनंतर झाकणातून वाफ बाहेर काढण्यात येते. त्यानंतर 10-20 मिनिटे वाफ थंडी होऊन ही डिश तयार होते. विशेष बाब म्हणजे मटण शिजवताना पाण्याचा वापर केला जात नाही. कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय का? पाहा Video 1400 रुपयात एक किलो मटण चंपारण मटण हे पूर्णतः बिहारी पद्धतीने तयार होतं. या मटणाचा स्वाद पूर्णतः वेगळा असून ग्रेव्ही लटपटी आहे. या प्रकारचा मेनू फक्त चंपारण मटण हाऊस असलेल्या फ्रेंचायसीमध्येच खायला मिळतो. या डिशची किंमत 1600 रुपये पर किलो नुसार आहे. मात्र, आमचे मटण हाऊस नागपुरात नवीन असल्याने ऑफरमध्ये 1400 रुपयात दिले जात आहे. हे मटण शॉप वासुदेव नगर मेट्रो स्टेशनच्या जवळ असून याची वेळ वेळ दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत आहे, अशी माहिती सूर्यप्रकाश पांडे यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात