जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ब्लूमिंग ऑनियन! कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय? पाहा Video

ब्लूमिंग ऑनियन! कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय? पाहा Video

ब्लूमिंग ऑनियन! कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय? पाहा Video

कोल्हापुरात प्रथमच ब्लूमिंग ऑनियन ही हाय-फाय डिश मिळू लागली आहे. ही डिश स्पेशली कांद्यापासून बनवली जाते.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 15 नोव्हेंबर : एखादया मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारी डिश ही स्ट्रीट फूड म्हणून आपल्याला खायला मिळाली की आपल्याला अनोखं वाटत. त्यात ती डिश जर चविष्ठ असेल, मग तर तिथे खवय्यांची रेलचेल आपल्याला नेहमीच बघायला मिळते. कोल्हापुरात प्रथमच ब्लूमिंग ऑनियन ही हाय-फाय डिश मिळू लागली आहे.  कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात खाऊ गल्ली आहे. या ठीकणी छाया स्नॅक्स प्रशांत साळोखे यांचे दुकान आहे. कोल्हापूरकरांसाठी त्यांनी स्प्रिंग पोटॅटो बरोबरच ब्लूमिंग ओनियन डिश आणली आहे. त्यामुळे या ठिकाणी खवय्यांची गर्दी पाहिला मिळत आहे. हेल्दी इव्हिनिंग स्नॅक म्हणून या डिशला मागणी  ही डिश बाहेरच्या देशांमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. पण भारतात स्ट्रीट फुड म्हणून ही डिश सहसा मिळत नाही. खरंतर ब्लूमिंग ओनियन म्हणजे फुलासारखा फुलणारा कांदा. एखाद्या फुलाप्रमाणे दिसणाऱ्या कांद्यामुळे या डिशला हे नाव मिळाले आहे. एक हेल्दी इव्हिनिंग स्नॅक म्हणून या डिशला बरीच मागणी आहे, असं दुकानदार प्रशांत साळोखे सांगतात.

    चुलीवरून थेट ताटात! ठिकपुर्लीची खास खवा बर्फी, Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

    ब्लूमिंग ऑनियन डिशची कल्पना सुचली कशी सुचली? लॉकडाऊन मध्ये युट्युबवर व्हिडिओ बघता बघता प्रशांत यांना ही ब्लूमिंग ऑनियनची कल्पना सुचली. पण त्यासाठी लागणारे मशीन हे लवकर मिळत नव्हते. तरी देखील प्रयत्नाअंती ती मशीन कोल्हापुरात आणून त्यांनी हा ब्लूमिंग ऑनियनचा व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांच्या दुकानात कित्येक प्रकारचे स्प्रिंग पोटॅटो आणि ब्लूमिंग ऑनियन आपल्याला खायला मिळते. कांदा भजीला पर्यायी डिश ही डिश स्पेशली कांद्यापासून बनवली जाते. त्यामुळे आपण कांदा भजीला पर्याय म्हणून या डिश कडे पाहू शकतो. तरी देखील यात वेगळेपण म्हणजे कांदा भजी ही बेसन पीठ वापरून बनवली जाते. पण ब्लूमिंग ऑनियनसाठी बेसन पीठ नाही तर ब्रेड क्रम्सचे मिश्रण लागते. त्यामुळे ही डिश कुरकुरीत बनते.

    संपूर्ण कोल्हापूर फिरलात तरी असे कबाब आणि चाट मिळणार नाही! पाहा Video

    स्वस्तात मस्त डिश ब्लूमिंग ऑनियन ही हॉटेल मधील स्पेशल डिश असल्यामुळे बाहेर हॉटेल मध्ये आपल्याला ही डिश 200/- रु. ते 300/- रु. पर्यंत मिळू शकते. पण प्रशांत यांच्या दुकानात ही डिश फक्त 50/- रु. मध्ये मिळत आहे.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे मिळते ही ब्लूमिंग ऑनियन डिश? छाया स्नॅक्स, खाऊ गल्ली, खासबाग मैदानाजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर - 416012 प्रशांत साळोखे - +91922522936

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात