कोल्हापूर, 17 डिसेंबर : बिर्याणी हा असा पदार्थ आहे की, जो घरातल्या सगळ्यांनाच आवडतो. मग ती शाखाहारी असो वा मांसाहारी. बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. कोल्हापुरा त अशीच एक प्रसिद्ध शाखाहारी बांबू बिर्याणी मिळते. गेल्या काही वर्षांपासून या बिर्याणीला ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. कधी झाली हॉटेलची सुरुवात? 1940 सालच्या आसपास हॉटेल महावीरची सुरुवात कोल्हापुरात झाली. सध्या निलेश चौगले हे हॉटेल चालवत आहेत. त्यांच्या पणजोबांनी हे हॉटेल सुरुवातीला खानावळ स्वरुपात चालू केले होते. निलेश यांनी हॉटेल मॅनजमेंटमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अनुभवासाठी बाहेरच्या नामांकित हॉटेल्समध्ये काम केले आणि मग आपला पिढीजात हॉटेलचा व्यवसाय सांभाळला आहे.
Kolhapur : आरोग्यदायी तांब्याच्या बंबातील चहाची चवच न्यारी….पाहा Video
… आणि शाकाहारी बिर्याणी बांम्बूमध्ये बनवण्याचे मी ठरवले कोल्हापूर हे सर्वत्र मांसाहारासाठी प्रसिद्ध आहे. तरी देखील याठिकाणी शाकाहारी काहीतर नवीन सुरू करण्याचा माझा विचार होता. मग त्यात बिर्याणी करायचे ठरले. पण त्यातही मला वेगळं काही करायचे होते. बऱ्याच ठिकाणी बघितले होते की, जिथे बांबूचे जास्त उत्पन्न होते, तिथे मांसाहारी पदार्थ बांबू मध्ये बनवले जातात. यावरूनच कोल्हापुरात शाकाहारी बिर्याणी तीही बांम्बूमध्ये बनवण्याचे मी ठरवले, असे निलेश यांनी सांगितले. ही बांबू बिर्याणी कोल्हापुरात सुरू करून मला 7-8 वर्षे झाली आहेत. यामध्ये नवीन प्रकार म्हणून शाकाहारी बांबू बिर्याणीबरोबरच पनीर बांबू बिर्याणी आणि काजू बांबू बिर्याणी देखील मी सुरू केली. या बांबू बिर्याणीची चव चाखायला खास कोल्हापूरसह पुणे, मुंबई या ठिकाणाहून लोक येतात. एवढेच नाही तर फक्त शाकाहारी बांबू बिर्याणी खाण्यासाठी हैदराबाद येथून देखील लोक येतात. त्याचबरोबर इथे बांबू बिर्याणी खाण्यासाठी अनेक शेफ, टीव्ही-सिनेमातील कलाकार येत असतात, असे देखील निखिल यांनी सांगितले.
गोलाकार नसून चक्क ‘इथं’ मिळते चौकोनी इडली, पाहा काय आहे खासियत video
कशी बनवली जाते बांबू बिर्याणी ? ही बिर्याणी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. यासाठी तांदूळ 2-3 तास भिजत घालावे लागतात. ते भिजलेले तांदूळ आणि शाकाहारी बिर्याणीसाठीच्या वेगवेगळ्या फळभाज्या एकत्र करून ते सगळे मिश्रण बांबूमध्ये भरले जाते. मग हा तयार केलेला बांबू तंदूर भट्टी मध्ये ठेवला जातो. त्यामुळे या बांबू मधील बिर्याणीला वेळ लागतो, असे निलेश यांनी सांगितले. कधी मिळते बिर्याणी ? हॉटेल महावीर सकाळी 11 ते दुपारी 3.30 पर्यंत आणि संध्याकाळी 7 ते रात्री 18.30 पर्यंत सुरू असते. जर बांबू बिर्याणी संध्याकाळी हवी असेल, तर दुपारी 3 वाजेपर्यंत ऑर्डर द्यावी लागते आणि बिर्याणी जर दुपारी हवी असेल, तर आदल्या दिवशी संध्याकाळी ऑर्डर द्यावी लागते. का खावी बांबू बिर्याणी ? बांबुमध्ये बिर्याणी बनवली जाते तेव्हा बांबूचा अर्क त्याच्यात उतरला जातो. आयुर्वेदात देखील बांबूचे फायदे सांगितले आहेत. त्यासाठी कोवळ्या बांबूची भाजी देखील खाल्ली जाते. त्यामुळे या बांबू बिर्याणीला भरपूर मागणी आहे. शाकाहारी बांबू बिर्याणीची किंमत 450 रुपये तर पनीर बांबू बिर्याणी आणि काजू बांबू बिर्याणी ही 500 रुपयांना मिळते.
Kheema Paratha : केरळी हॉटेलमध्ये मिळते फेमस कोल्हापूरी डिश, पाहा Recipe Videoबांबूमध्ये वांगीची भाजी निखिल हे त्यांच्या बांबू बिर्याणी सोबत बांबूमध्ये वांगीची भाजी बनवून देतात. या विशेष भाजीला देखील कोल्हापूरचे खवय्ये चांगला प्रतिसाद देत आहेत.
हॉटेलचा पत्ता : हॉटेल महावीर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर, बीटी कॉलेज रोड, ई वॉर्ड, 4 थी गल्ली, शाहुपुरी, कोल्हापूर संपर्क (निलेश चौगले) - +918668414789